Home /News /lifestyle /

आधीच ओळखा गॅस सिलिंडर संपण्याची तारीख; वापरा सोपी Trick

आधीच ओळखा गॅस सिलिंडर संपण्याची तारीख; वापरा सोपी Trick

गॅस सिलिंडर (Gas Cylinder) संपल्यानंतर होणारी धावपळ फक्त गृहिणींनाच समजू शकते. या सोप्या पद्धतीने (Easy Trick) चेक केलं तर, गॅस संपण्याआधीच त्याची कल्पना येऊ शकते.

    नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : गॅस सिलेंडर (Gas Cylinder) आपल्या या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. गॅस सिलेंडर संपल्यानंतर होणारी धावपळ फक्त गृहिणींनाच (Housewives) समजू शकते. घरातला गॅस स्वयंपाक करता करता संपला तर त्यापेक्षा बिकट प्रसंग(Difficult Situation) कोणताच नसतो. अशात एक्स्ट्रा सिलेंडर (Extra Cylinder)घरांमध्ये नसेल किंवा सिलेंडर भरून आणायला विसरला असा तर, मात्र जेवणाचे वांदे होतात. पण सिलेंडरच्या टाकीमध्ये किती गॅस (Gas) आहे हे कळणं फारच कठीण असतं. कधीकधी आपण गॅसची टाकी हलवून चेक करतो. मात्र, तरीही सिलेंडरमध्ये किती गॅस भरलेला आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. सिलेंडर संपला तर, तो किती दिवसांनी मिळणार हा देखील प्रश्न असतो. अशा वेळेस जेवण बाहेरून मागवावं लागतं किंवा आहे त्या परिस्थितीत भागवावं लागतं. हा प्रसंग कितीतरी जणांनी अनुभवलेला असतो. त्यामुळे गॅस सिलेंडर संपण्याआधीच कळालं तर या अडचणींमध्ये फायदा होऊ शकतो. (मजबूत केस आणि नितळ त्वचेसाठी ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा आश्चर्यकारक फायदे) गॅस सिलेंडर संपण्याआधीच त्यात किती गॅस राहीला आहे हे ओळखण्यासाठी एक सोपी ट्रिक (Trick) पाहूयात. (कोरोनामुक्त रुग्णाला नीट चालता-बोलता येईना; मेंदूत जे सापडलं ते पाहून डॉक्टर शॉक) त्यासाठी फक्त पाणी आणि एका मोठ्या कापडाची आवश्यकता आहे. कापड पाण्यामध्ये बुडवून पिळून घ्या. आता हे ओलं झालेलं कापड सिलेंडरवर गुंडाळा थोड्यावेळाने कापड बाजूला करा. सिलेंडर टाकीवर पाण्याचे ठसे उमटलेले असतील. या ठशांचं व्यवस्थित निरीक्षण करा. (अपयश येऊनही सोडले नाहीत प्रयत्न; IAS गुंजन द्विवेदी यांची ‘Smart Study Strategy’) ज्या भागामध्ये ओलसरपणा राहिलेला आहे तेवढा भाग सिलेंडर भरलेला आहे असं समजावं. गॅस नसलेला भाग कोरडा असेल कारण, ज्या भागांमध्ये गॅस असतो त्या भागांमध्ये थंडावा असतो तर, गॅस संपलेल्या भागांमध्ये उष्णता निर्माण झालेली असते. ही सोपी ट्रिक दर महिन्याला वापरून सिलेंडर संपल्यानंतर होणाऱ्या झंझटपासून वाचू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Easy hack, Gas, Lifestyle, LPG Price

    पुढील बातम्या