नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : देशभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र, त्यातल्या फार कमी लोकांना या परीक्षेमध्ये यश येतं आणि त्यांचं आयएएस ऑफिसर (IAS Officer) होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) यशस्वी होण्यासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी अभ्यासासाठी (UPSC Study Strategy) अवलंबणं गरजेचा आहे. यूपीएससी परीक्षासाठी (UPSC Exam) झोकून देऊन मेहनत करावी लागते. आयएएस ऑफिसर गुंजन द्विवेदी (IAS Officer Gunjan Dwivedi) यांनी देखील UPSC परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी 5 वर्षे प्रयत्न केले.
गुंजन द्विवेदी उत्तर प्रदेश लखनऊ(Lucknow, Uttar Pradesh) शहरामध्ये राहणाऱ्या आहेत त्यांचे वडील IPS ऑफिसर आहेत. शिवाय त्यांची बहीण देखील सरकारी कर्मचारी आहे. त्यामुळेच त्यांनी देखील IAS होण्याचा निर्णय घेत UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
(गरीब कुटुंबात जन्मलेले IPS ऑफिसर प्रेमसुख डेलू; 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी)
2014 साली त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि 2016 ला पहिल्यांदा युपीएससीचा प्रयत्न केला. मात्र, 2 वेळा त्यांना अपयश आलं. तिसऱ्या वेळी त्यांनी आपल्या अभ्यासाची पद्धत बदलली. आपल्या चुकांचा अभ्यास केला आणि सुधारणा केली त्यानंतर त्यांना सिव्हिल सेवा परीक्षेमध्ये यश मिळवलं.
(वर्किंग कपल्स या 4 महत्त्वाच्या फायद्यांसाठी तयार होतायत Joint Family साठी)
2018साली त्यांनी 9 रँक मिळवत आपल्या 5 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. गुंजन द्विवेदी UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना NCRT पुस्तकांचा अभ्यास करण्याचा सल्ला देतात. शिवाय फक्त पाठांतर करण्यापेक्षा अॅनॅलेसिस, रिव्हिजन आणि उत्तर उत्तरपत्रिकांचा अभ्यास करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc exam