मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरगुती टिप्स: मजबूत केस आणि नितळ त्वचेसाठी ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा आश्चर्यकारक फायदे

घरगुती टिप्स: मजबूत केस आणि नितळ त्वचेसाठी ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा आश्चर्यकारक फायदे

बडीशेप एक प्रकारे क्लिंजरचं काम करते.

बडीशेप एक प्रकारे क्लिंजरचं काम करते.

बडीशेप(Fennel Seeds)आपली त्वचा आणि केसांचं(Skin & Hair)आरोग्य चांगलं ठेवू शकतं. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, मॅंगनीज, फोलेट, लोह यासारखे पोषक घटक असतात.

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : जेवणानंतर बडीशेप (Fennel Seeds)खायला सगळ्यांना आवडते. बडीशेप एक उत्तम माउथ फ्रेश्नर (Mouth Freshener) आहे. यामुळे तोंडाला जेवणाचा वास येत नाही आणि पचनही(Digestion) सुधारतं. याबरोबर केस आणि त्वचेच्या (Skin & Hair) चांगल्या आरोग्यासाठी (Health) बडीशेप वापरू शकता. यामुळे त्वचा आणि केसांचा पोत सुधारून सुंदर (Beautiful) होतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅंगनीज, फोलेट, लोह सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं. आता यासाठी बडीशेप कशी वापरायची ते जाणून घेऊयात.

स्किन क्लिनिंग

बडीशेप एक प्रकारे क्लिंजरचं काम करते. त्वचेवरील धूळ,घाण साफ करण्यापासून पिंपल्स कमी करण्यात मदत करते. एका मोठ्या भांड्यात 3 ते 4 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा बडीशेप घालून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. पणी थंड झाल्यावर त्यात टी ट्री ऑईलचे काही थेबं घाला. हे पाणी दिवसातून 2 किंवा 3 वेळा चेहरा धुवण्यासाठी वापरा. शक्य असल्यास हे पाणी कापसाच्या बोळ्याने त्वचेवर लावा आणि 15 ते 20 मिनिटं राहू द्या. नंतर आपला चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवरची रोमछिद्र उघडतील. घाण, मळ, तेलकटपणा आणि डेड स्किन सारख्या समस्या कमी होतील.

(Chanakya Niti: लहान वयात मुलांवर करा ‘असे’ संस्कार; प्रगतीपासून रोखू शकणार नाही)

पिंपल्स आणि रॅशेससाठी

चेहऱ्यावरचे मुरुम, त्यावर आलेली सूज आणि लालसरपणा दूर करण्यासाठी बडीशेप वापरू शकता. यासाठी 1 चमचा बडीशेप पाण्यात भिजवून 20 मिनिटांनी हे पाणी गाळून घ्या. आता या पाण्यात 1 चमचा दलिया म्हणजे गव्हाचा रवा आणि अर्धा चमचा मध मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

(IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा)

रिंकल्स कमी करण्यासाठी

वेळेआधी त्वचेवर सुरकुत्या दिसायाला लागल्या असतील. तर, त्यावर उपाय म्हणून बडीशेप वापरा. एका काचेच्या भाड्यत पाणी घेऊन 2 चमचे बडीशेप घाला आणि ते पाणी 2 मिनिटं गरम करा. पाणी थंड झाल्यावर त्यात 1 चमचा दही घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

(वेळीच द्या ‘या’ लक्षणांकडे लक्ष नाहीतर, येईल हार्ट अटॅक)

केस काळे राहण्यासाठी

केस अकाली पांढरे व्हायला लागले असतील तर, केसांसाठी बडीशेपच्या पाण्याचा वापर करा. एका ग्लास गरम पाण्यात 2 चमचे बडीशेप भिजवून 20 मिनिटांसाठी ठेवा. नंतर हे पाणी गाळून अर्धा बादली पाण्यात मिसळा. या पाण्याने केस धुवा. केसं लवकर सफेद होणार नाहीत.

First published:
top videos

    Tags: Home remedies, Lifestyle, Skin care, Woman hair