हैदराबाद, 06 ऑगस्ट : कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांना गंभीर आणि भयंकर अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. हैदराबादमधील (Hyderabad) एक रुग्ण या वर्षीच्या मे महिन्यात कोविडमधून (Covid19) बरा झाला होता. त्यानंतर त्याला हाता-पायांची शक्ती (Weakness in Limbs) गेल्यासारखं वाटत होतं, तसंच बोलण्यातही अडथळा निर्माण होत होता (Post covid complication). तपासणीत त्याच्या मेंदूत पांढऱ्या बुरशीने (White fungus) गळू (Abscess) तयार केल्याचं निदान झालं.
कोविडची दुसरी लाट शिखरावर असताना या व्यक्तीला कोविड झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सहाव्या दिवशी त्याने आपल्या हातापायात शक्ती जाणवत नसल्याचं, तसंच बोलताना अडथळा येत असल्याचं सांगितलं. हिमॅटोमॅची (Haematoma) शक्यता गृहीत धरून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र मेंदूचा एमआरआय (MRI) दोनदा केल्यानंतर त्याच्या मेंदूत झालेली अनैसर्गिक वाढ दिसून आली. त्याच्या मेंदूत गुठळ्यांसारखं (Clot like Formation) काही तरी तयार झाल्याचं स्कॅनमधून आढळलं आणि औषधोपचारांनंतरही ते कमी होईना. म्हणून त्या रुग्णावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्याचा निर्णय डॉक्टर्सनी घेतला.
हे वाचा - कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी
सनशाइन हॉस्पिटलमधले ज्येष्ठ न्युरोसर्जन डॉ. पी. रंगनाधम (Dr P. Ranganadham) यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, की हा प्रकार दुर्मिळ आहे.
डॉ. रंगनाधम यांनी सांगितलं, 'पांढऱ्या बुरशीमुळे (White Fungus) मेंदूत गळू तयार होण्याचं हे प्रकरण दुर्मिळ आहे. मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर पांढऱ्या बुरशीने हल्ला केल्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेला अॅस्पर्जिलॉसिस होतो. अॅस्पर्जिलसमुळे (Inflammation) मेंदूचा दाह किंवा सूज येणं (granuloma) हे दुर्मिळ नाही. मात्र पांढऱ्या बुरशीमुळे गळूची निर्मिती होणं हे मात्र दुर्मिळ आहे.
हे वाचा - कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार; मोदी सरकारचा निर्णय
या रुग्णाला हा संसर्ग कोविड-19मधून बरं झाल्यानंतर झाला आहे. सर्वसाधारणपणे कोविड-19 चा रुग्ण डायबेटिक अर्थात मधुमेही असेल, तर त्याला बुरशीचा संसर्ग होतो. हा रुग्ण मात्र मधुमेही नाही. पॅरानेझल सायनसेसच्या (Pananasal Sinuses) अभ्यासावरून हे स्पष्ट झालं आहे, की काळ्या बुरशीप्रमाणे पांढऱ्या बुरशीने रुग्णाच्या नाकातून मेंदूत प्रवेश केलेला नाही,' असं डॉ. पी. रंगनाधम यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus