मुंबई, 20 जुलै : भारतीय आयुर्वेदात अनेक वर्षांपासून आवळा वापरला जात आहे. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे आवळा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. त्याचबरोबर वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याचेही काम करतो. हेल्थलाइनच्या मते, आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक सेल्युलरचे नुकसान टाळतात. ज्यामुळे शरीराची नैसर्गिक वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होण्यास मदत होते. इतकेच नाही तर ते त्वचेतील कोलेजनचे विघटन रोखण्यासदेखील सक्षम आहे. जे त्वचेमध्ये उपस्थित मऊ उती आणि त्वचेच्या प्रोटीनचे उत्पादन सुधारते. चला तर मग जाणून घेऊया आवळा आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. वृद्धत्वाच्या खुणा कमी करणे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आवळा त्वचेला लवचिक बनवतो. ज्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर वयासोबत चेहऱ्यावर येणारे पिगमेंटेशन दूर ठेवण्यासही मदत होते. Diet Tips: 40 वर्षानंतर आहाराची काळजी घ्याच; एक्सपर्टसने सांगितलेल्या या 3 सोप्या टिप्स वापरा पुरळांची समस्या करते कमी आवळ्याच्या नियमित सेवनाने मुरुम आणि पुरळांची समस्या होत नाही. हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. इतकंच नाही तर मुरुमांच्या खुणा लवकर कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा डागविरहित होते. यासाठी फक्त त्याचा आहारात समावेश करू नका. तर तुम्ही त्याचा फेस पॅकही लावू शकता. चमकदार त्वचा आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे त्वचेवर चमक येते. एवढेच नाही तर त्वचेचा टोन सुधारण्यासही मदत होते. यासाठी डाएट व्यतिरिक्त तुम्ही हवे असल्यास चेहरा आवळा पाण्याने धुवू शकता. तुम्ही एक चमचा आवळा पावडर एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि सकाळी त्या पाण्याने चेहरा धुवा. हे पाणी तुम्ही सकाळी पिऊदेखील शकता. Avocado peel benefits : अॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हाल त्वचा एक्सफॉलिएट होते त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा रस वापरू शकता. हे मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा स्वच्छ करते. तुम्ही आवळा बारीक करून चेहऱ्यावर स्क्रबर म्हणूनही वापरू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







