Home /News /lifestyle /

Avocado peel benefits : अ‍ॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हाल

Avocado peel benefits : अ‍ॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हाल

अ‍ॅव्होकाडोच्या सालीमध्ये (Avocado Peel Benefits) फॅटी अ‍ॅसिड आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर असतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात.

  मुंबई, 28 जून : आपण उत्तम आरोग्यासाठी अनेक फळं खातो. मात्र बऱ्याच फळांच्या साली आपण सरळ सरळ फेकून देतो. संत्री, मोसंबीची साल जशी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असते. तशीच अ‍ॅव्होकाडो (Avocado Benefits) या सालदेखील आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असते. अ‍ॅव्होकाडोच्या सालीमध्ये (Avocado Peel Benefits) फॅटी अ‍ॅसिड आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर असतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात. अ‍ॅव्होकाडोच्या सालीमध्ये अधिक उपयुक्त पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला अ‍ॅव्होकाडोच्या सालीचे (Avocado Skin Benefits) काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. हे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच ही साल फेकून देता तिचा वापर कराल. हरजिंदगीमध्ये प्रकशित झालेल्या माहितीनुसार, जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की अ‍ॅव्होकाडोच्या सालीमध्ये कॅरोटीनॉइड्स, फेनोलिक कंपाऊंड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या मुख्य अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. हे सर्व तुमच्या शरीराला जळजळ होण्यापासून वाचवण्यास मदत करू शकतात. अ‍ॅव्होकाडोच्या सालीचा चहा अ‍ॅव्होकाडोच्या सालीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे पोषक घटक तुमच्या शरीरावरील दाहक ताण कमी करण्यास मदत करू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्त प्रवाह वाढतो. चहा हा आवश्यक पदार्थांचे (Avocado Tea) सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हा चहा बनवण्यासाठी कप पाण्यामध्ये अ‍ॅव्होकाडोची साल घ्या आणि ती 5 मिनिटे उकळू द्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या. हे ग्रीन टीसारखे दिसते. याचा कडूपणा कमी करण्यासाठी हवा असल्यास यामध्ये 1 चमचा मध घालू घाला.

  Almonds Side Effect : बुद्धी तल्लग करणारे बदाम अति प्रमाणात खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

  आंघोळीच्या पाण्यात मिसळा मऊ त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यातही अ‍ॅव्होकाडोची साल वापरू शकता. त्याचबरोबर अ‍ॅव्होकाडोच्या सालीने घासून तुम्ही त्वचा स्वच्छ करा. एवोकॅडो तेलामध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यात व्हिटॅमिन सी आणि ई असते, जे आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करण्यात मदत करतात.

  Diet Tips: 40 वर्षानंतर आहाराची काळजी घ्याच; एक्सपर्टसने सांगितलेल्या या 3 सोप्या टिप्स वापरा

  सालीचा खत म्हणून करा वापर अ‍ॅव्होकाडो रिंड कंपोस्टसाठी (Avocado Compost) योग्य आहे. अ‍ॅव्होकाडोची रफ त्वचा तपकिरी रंगाच्या घटकांनी बनलेली असते. हिरवे पदार्थ नायट्रोजनमध्ये समृद्ध असतात, जे चांगले बॅक्टेरिया वाढण्यास आणि विकसित होण्यास मदत करतात. तपकिरी पदार्थ हे कार्बनचे स्त्रोत आहेत जे सूक्ष्मजीवांना दीर्घकालीन ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे अ‍ॅव्होकाडोच्या सालीचे बारीक बारीक तुकडे ते खत म्हणून वापरा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health, Health Tips, Lifestyle, Superfood

  पुढील बातम्या