मुंबई, 28 जून : आजच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे झाले आहे. विशेषत: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आजकाल बहुतेक कामे संगणक किंवा लॅपटॉपद्वारे केली जातात, त्यामुळे लोकांची शारीरिक हालचाल फार कमी झाली आहे. खाण्या-पिण्यावर बंधने आणणेही गरजेचे आहे. जर आपण वयाची 40 वर्षे पूर्ण केली असतील किंवा त्याच्या आसपास वय असेल तर खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागतील, अन्यथा आपल्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शारदा हॉस्पिटल (ग्रेटर नोएडा) च्या आहारतज्ज्ञ आयेशा सलमानी यांनी 40 वर्षांच्या स्त्री-पुरुषांनी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टींचा आहारात नियमितपणे समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपण वयानुसार शारीरिक, मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त (Diet Tips for 40 years People) राहाल. चाळीशीच्या पुढे अनेक आरोग्य समस्या उद्भवू लागतात - वयाची 40 वर्षे ही माणसासाठी अशी अवस्था असते, जिथे आहार, दिनचर्येमध्ये थोडासा निष्काळजीपणा केला की, आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. मधुमेह, लठ्ठपणा, चयापचय मंदावणे तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते. याशिवाय हृदयाशी संबंधित आजारही दार ठोठावू लागतात. तथापि, आजकाल 30 वर्षांच्या लोकांमध्ये देखील हृदयाशी संबंधित समस्या लक्षणीय वाढल्या आहेत. यासाठी जीवनशैलीत काही बदल करणं आणि आहारात हेल्दी पदार्थ घेणे गरजेचे आहे. वयाच्या 40 व्या वर्षी आहारात हे बदल करा - आहारात कॅल्शियमचा पाहिजे - वयाच्या 40 व्या वर्षी महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. या वयातील लोकांची हाडे कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कॅल्शियमची जास्त गरज असते. या वयात स्त्री-पुरुष दोघांनीही आहारात ब्रोकोली, संत्री, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा अधिकाधिक समावेश करावा. अनेकदा या वयातील पुरुषांना वाटते की त्यांची हाडे मजबूत आहेत, त्यांना काही त्रास होणार नाही, म्हणून ते दूध, दही यांचे सेवन कमी करतात. असं करणं टाळा. आपण दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करावे, कारण या गोष्टींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम व्हिटॅमिन डी हवं - व्हिटॅमिन डी मुळे हाडे मजबूत होतात, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. याशिवाय हे ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सरपासूनही संरक्षण मिळते. महिलांनी ‘ड’ जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सकाळच्या उन्हात थोडा वेळ बसणे आवश्यक आहे. वयाच्या 40 व्या वर्षी पोहोचताच शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासते, त्यामुळे या वयात अशा गोष्टी अधिकाधिक खाव्यात, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळेल. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार नियमितपणे फायबर खा - फायबर आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षण करते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करते. अशा गोष्टी खाव्यात, जेणेकरून शरीराला डाएटरी आणि विरघळणारे दोन्ही फायबर पुरेशा प्रमाणात मिळू शकतील. यासाठी फळे, भाज्या, बार्ली, ओट्स, तृणधान्ये इत्यादींचे रोज सेवन करावे. हे सर्व घटक पचनसंबंधित समस्यांपासून बचाव करतात. पोट स्वच्छ राहते. वजन नियंत्रणात राहते, कारण फायबरच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहार आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.