मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

NASA Astronaut स्पेसमधून निवडणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष; कसं करणार मतदान पाहा

NASA Astronaut स्पेसमधून निवडणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष; कसं करणार मतदान पाहा

NASA ची अंतराळवीर केट रुबिन्स (Kate Rubins) US presidential elections साठी अंतराळातून मतदान करणार आहे.

NASA ची अंतराळवीर केट रुबिन्स (Kate Rubins) US presidential elections साठी अंतराळातून मतदान करणार आहे.

NASA ची अंतराळवीर केट रुबिन्स (Kate Rubins) US presidential elections साठी अंतराळातून मतदान करणार आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 30 सप्टेंबर : जगभरात कोरोनाचं संकट असताना अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक (US presidential elections 2020) पार पडणार आहे. पण कोरोनाचं संकट असताना नागरिक मतदान (Voting) कसं करणार हा सध्या मोठा प्रश्न अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे यावेळी ऑनलाइन मतदान आणि ईमेलच्या माध्यमातून मतदान करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असणार आहे. त्याचबरोबर बॅलेट पेपरच्या माध्यमातून देखील मतदान करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. पण जर एखादा अमेरिकन नागरिक अंतराळात (Astronaut) असेल  तर तो मतदान कसं करेल? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

अमेरिकेन अंतराळवीरांनादेखील मतदान करता येतं. यासाठी खास व्यवस्था आहे. नासामधील (NASA) अंतराळवीर केट रुबिन्स (Kate Rubins) या निवडणुकीवेळी नासाच्या स्पेस स्टेशनमध्येअसणार आहे. पण त्या ठिकाणाहून देखील ती मतदान करू शकणार आहे.

अंतराळवीरांना हॅरिस आणि ब्रेझोरिया काउंटींच्या ऑफिसमधून नासाच्या स्पेस सेंटरमध्ये खास ईमेलच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये एक इलेक्ट्रॉनिक बॅलेट पेपर पाठवण्यात येतो. यामध्ये उमेदवारांची नावं दिलेली असतात. त्यांना एक उमेदवार निवडायचा असतो. प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा तो मेल काउंटीच्या ऑफिसमध्ये पाठवला जातो. या प्रक्रियेमध्ये हा मेल इतरत्र कुठेही जाणार याची याची काळजी घेतली जाते. अशा पद्धतीने अंतराळवीर स्पेस स्टेशनमधून आपलं मतदान करू शकतात.

हे वाचा - पराभवानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पदच सोडलं नाही तर?

या पद्धतीने मतदान करणारी Kate Rubins ही पहिली अंतराळवीर नाही. याआधी देखील अनेकांनी या पद्धतीने स्पेस स्टेशनमधून मतदान केलं आहे. स्पेस स्टेशनमधून मतदान करणाऱ्या पहिल्या अमेरिकी नागरिकाचं नाव David Wolf असं आहे. त्याने रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकातून मतदान केलं होतं. 2016 मधील निवडणुकीतदेखील Shane Kimbrough याने अशाच पद्धतीनं मतदान केलं होतं.

हे वाचा - भारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा

अमेरिकेमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. सध्याचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अशी टक्कर होणार आहे. 29 सप्टेंबरला जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील 'फेस ऑफ' या चर्चेची पहिली फेरी झाली. या चर्चेवरही कोरोनाचं सावट स्पष्ट दिसत होतं. अमेरिकन टीव्हीवरून दाखवण्यात आलेली पहिली चर्चा होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात काय होतं याची संपूर्ण जगालाच उत्सुकता लागून राहिली आहे.

First published:

Tags: Election, US President, Voting