जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उर्फी जावेदला झाला घशाचा संसर्ग, जाणून घ्या कशामुळे होते लेरिन्जाइटिस इंफेक्शन

उर्फी जावेदला झाला घशाचा संसर्ग, जाणून घ्या कशामुळे होते लेरिन्जाइटिस इंफेक्शन

उर्फी जावेदला झाला घशाचा संसर्ग, जाणून घ्या कशामुळे होते लेरिन्जाइटिस इंफेक्शन

सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदला घशाचा संसर्ग झाला आहे. याला लेरिन्जाइटिस असे म्हणतात. ती सध्या दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. हा आजार नेमका आहे तरी काय याबाबत जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या अनोख्या पेहरावामुळे चर्चेत असते. परंतु आता ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदला घशाचा संसर्ग झाला आहे याला लेरिन्जाइटिस (Laryngitis) असे म्हणतात. सध्या ती त्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात ती दुबईतील एका रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहे. उर्फीला झालेला हा आजार कशामुळे होऊ होतो आणि तो किती धोकादायक आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या लेखातून त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. लेरिन्जाइटिस म्हणजे काय? मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार जेव्हा जास्त संभाषण, चिडचिड किंवा कोणत्याही संसर्गामुळे घशाच्या स्वरयंत्रांत (लॅरिन्क्स) सूज येते तेव्हा लेरिन्जाइटिसचा त्रास होता. हा अवयव तुमच्या घशाच्या वरच्या भागात असतो. व्हॉइस बॉक्समध्ये सूज आल्याने आवाज नीट बाहेर पडत नाही आणि कर्कश आवाज येऊ लागतो. लॅरिन्जायटिसची समस्या थोड्या काळासाठी असू शकते. परंतु काही प्रकरणांमध्ये दीर्घकाळ त्याचा त्रास होऊ शकतो.

हिवाळ्यात रूम हिटर वापरणं ठरू शकतं घातक; हे दुष्परिणाम एकदा नक्की वाचा

कशामुळे होतो लेरिन्जाइटिस? बहुतेक प्रकरणांमध्ये लेरिन्जाइटिससची समस्या टेंपररी व्हायरल इन्फेक्शन आणि सर्दीमुळे होते. याला तीव्र स्वरयंत्राचा दाह म्हणजेच अॅक्यूट लेरिन्जाइटिसस म्हणतात. ही समस्या स्वराचा ताण, जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्ग, घशाचा अतिवापर यामुळे देखील होऊ शकते. अॅक्यूट लेरिन्जाइटिसस काही दिवसात स्वतःच बरा होतो, तर क्रॉनिक लेरिन्जाइटिस केमिकल फ्यूम्स, ऍलर्जी, अॅसिड रिफ्लक्स, क्रॉनिक सायनस, जास्त मद्यपान आणि धूम्रपान यामुळे होऊ शकतो. क्रॉनिक लॅरिन्जायटिस बरा होण्यासाठी 3 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

लॅरिन्जायटिसची लक्षणे - घसा खवखवणे - घसा पुन्हा पुन्हा कोरडा होणे - आवाज कर्कशपणा येणे - कमी आवाज होणे - घशात संवेदना जाणवणे - कोरडा खोकला येणे - श्वास घेण्यास त्रास होणे लॅरिन्जायटिस कसा टाळावा? धुम्रपान टाळावे : धूम्रपान केल्याने घसा कोरडा होतो आणि व्होकल कॉर्डवर ताण येतो. तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजच सोडा. अल्कोहोल आणि कॅफिनचा वापर कमी करा : अल्कोहोल आणि कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पाणी कमी होते. यामुळे लॅरिन्जायटीसचा धोका वाढतो. पुरेसे पाणी प्यावे : पाणी प्यायल्याने आपल्या घशातील श्लेष्मा पातळ राहतो आणि घसा सहज साफ होतो. मसालेदार पदार्थ खाणे टाळा : मसालेदार पदार्थांमुळे पोट खराब होऊ शकते आणि अॅसिड रिफ्लक्स किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. या कारणांमुळेही अनेकदा घशातलॅरिन्जायटीसचाचा त्रास होतो. फळं भाज्या खा : आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा.या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि घसा निरोगी राहतो. Makhana : मखाना एवढा महाग का असतो? त्यात नेमकं असं काय असतं? सतत हात धुवा : वेळोवेळी आपले हात धुवा आणि सर्दी आणि फ्लू सारखे श्वसन संक्रमणापासून दूर राहा. घसा साफ करताना काळजी घ्या आणि पुन्हा पुन्हा साफ करू नका. असे केल्याने घशात सूज येऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात