नवी दिल्ली, 22 जुलै : हल्ली डायबेटीज (Diabetes) हा सर्वसांमान्य आजार बनलेला आहे. डायबिटीज किंवा ब्लड शुगर लेव्हल कमी (Low Blood Sugar) जास्त असण्याचा त्रास अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो. डायबेटीजमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. डायबिटीज आपला नसा, मेंदू, पेशी, किडनी, हृदय, लिव्हर यांच्यावर परिणाम करतो.
ज्याप्रमाणे ब्लड शुगर वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्याप्रमाणेच ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याने देखील अनेक आरोग्य समस्या (Health Problem) व्हायला लागतात. मधुमेहाच्या रुग्णांबरोबर हेल्दी लोकांना देखील ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्याचा त्रास होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांच्यामते (Health expert) ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स (Compliications) वाढतात. तज्ज्ञांच्यामते जेवणाआधी नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल 80 ते 130 मिलीग्राम प्रति डेसीलीटर असावी तर, जेवल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल 180 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा कमी असावी.
हाय ब्लड शुगर लेव्हलचा त्रास असेल तर, सतत लघवी येत राहते. याशिवाय थकवा येणं, सतत तहान लागणं, स्कीन ड्राय होऊन खाज येणं, इन्फेक्शन होणं हे त्रास देखील होत राहतात. वजन वाढीचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल हाय होऊन डायबिटीस होण्याचा धोकाही जास्त असतो.
(स्वादुपिंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी असा घ्या आहार; अॅसिडिटीचा त्रास होईल कमी)
हाय ब्लड शुगर लेव्हल आपल्या शरीरातील पेशींचा नाश करतं. यामुळे शरीरात उर्जा कमी व्हायला लागते. दिवसभर आराम करून देखील थकवा जाणवत राहतो. याशिवाय डोळ्यांचे विकार व्हायला लागतात.
लो ब्लड शुगर लेव्हल
शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी झाली की त्यावेळी मसल्स आणि टिश्युज शुगर शरीरात पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या अतिरिक्त ताणामुळे शरीरात शुगर लेव्हल आणखीन कमी व्हायला लागते.
(आजच बदला तुमच्या या दैनंदिन 9 सवयी; अन्यथा स्वतःच द्याल मृत्यूला आमंत्रण)
आहार तज्ज्ञांच्यामते शरीरामध्ये कार्बोहायड्रेड कमी झाले तर, ब्लड शुगर लेव्हल कमी होते. ब्लड शुगर कमी झाली की एड्रनेलिन हार्मोन्स स्त्रवायला लागतात. त्यामुळे हार्ट रेट वाढतो परिणामी घाम येणं, अंग थरथरणे, घाबरल्यासारखं वाटणं, चिडचिडेपणा वाढणे असे त्रास व्हायला लागतात.
(जंगलात फक्त एका रात्रीसाठी गेलं नवं जोडपं; 10 दिवस देत होते जीवनमृत्यूशी झुंज)
ज्यांच्या शरीरामध्ये 70 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यालाच लो ब्लड शुगर लेव्हल म्हटलं जातं. मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात शुगर पोहोचली नाही तर स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. याशिवाय बोलतानाही अडचण यायला लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle