Home /News /lifestyle /

हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अ‍ॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे

हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अ‍ॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे

हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

अलीकडच्या काळात यूरिक अ‍ॅसिड वाढणं एक गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात.

    दिल्ली,22 जुलै : सांधेदुखीचा (Joint pain) त्रास लवकर सुरु झाला असेल तर, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. बदललेली लाईफस्टाईल (Lifestyle), जंक फूड खाणं (Junk food)यामुळे शरीरामध्ये काही चुकीचे घटक जातात. त्याचे दुष्परिणाम (Bad Effect) आपल्या शरीरावर होतात. या सवयींमुळे होणाऱ्या त्रासांपैकी एक त्रास म्हणजे शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडचं(Uric Acid) प्रमाण वाढणं. अलीकडच्या काळात यूरिक ऍसिड वाढणं एक गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. आपलं शरीर किडनी (Kidney)मार्फत यूरिक ॲसिड फिल्टर करतं. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल तर हे ऍसिड फिल्टर करण्यात अडचणी येतात आणि त्यामुळेच रक्तात यूरिक ॲसिड वाढण्यास सुरुवात होते आणि सांधेदुखीची समस्या उद्भवते. यूरिक अ‍ॅसिडमुळे त्रास यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात. चालणं, उठणं-बसणं देखील कठीण होऊन जातं. यूरिक ऍसिड शरीरात वाढायला लागलं की ते आपल्या संध्यांजवळ जमा व्हायला लागतं. हे कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. (लो ब्लड शुगर लेव्हलनेही होते त्रास; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष) गुणकारी हळद या त्रासावर हळद गुणकारी ठरेत. सगळ्यांच्या किचनमध्ये हळद असतेच. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी हळद सर्वात जास्त प्रभावी ठरते. यात कर्क्युमिन नावाचा घटक असतो. जो युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त असल्यास संधीवाताच त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हायपर्यूरिसेमिया असलेल्या लोकांना सांधेदुखी,स्नायूंमध्ये अवघडलेपणा आणि सूज येते. सांधेदुखीसंदर्भात 2016 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार  कर्क्युमिन उपयोगी ठरतं. तर, 2013 मध्ये झालेल्या रिसर्चनुसार कर्क्युमिनमध्ये फ्लेक्सोफिटॉल नावाचा घटक असतो. (पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी सामोसाच वाईट का?) ज्यामुळे वेदना कमी होतात. तज्ज्ञांच्या मते युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी हळदीचा वापर करता येतो. हळद आरोग्यासाठी उत्तम आहे. दररोज रात्री हळदीचं दूध प्यायल्याने पायांची सुज कमी होते. हळदीचं दूध करताना त्यात चिमूटभर मिरी पावडरचाही वापर करावा. याशिवाय हळदीचा चहादेखील पिता येतो. (बॉडी वॅक्सिंगसाठी वापरा ही ट्रिक; अनावश्यक केस होतील गायब) हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनच्या कॅप्सूल देखील संधिवातासाठी घेता येतात. पण, अशा कॅप्सूल घेतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हळदिची पेस्ट दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास आरामही पडतो. त्यासाठी थोडीशी हळद आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण वेदना होणाऱ्या भागावर लावा. याशिवाय ओल्या हळदीचाही वापर करता येतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या