मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Dispoject Safety Needle ने दिली जाणार कोरोना लस; भारतात लसीकरण आता अधिक सुरक्षित

Dispoject Safety Needle ने दिली जाणार कोरोना लस; भारतात लसीकरण आता अधिक सुरक्षित

डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडलच्या (Dispoject Safety Needle) निर्मितीसाठी 4 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.

डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडलच्या (Dispoject Safety Needle) निर्मितीसाठी 4 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.

डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडलच्या (Dispoject Safety Needle) निर्मितीसाठी 4 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.

   नवी दिल्ली, 02 जुलै : कोरोना विषाणूच्या संसर्गाला (Coronavirus) रोखण्यासाठी जगभरात लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात आहे. सध्या इंजेक्शनमार्फतच कोरोना लस दिली जाते आहे. भारतात लस देण्यासाठी सध्या 2 रुपयांच्या सीरिंजचा वापर केला जातो. यात एक पारंपारिक नीडल लावलेली असते; मात्र आता येत असलेली डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडल यापेक्षा वेगळी आहे.  अमेरिकेत यापूर्वीपासूनच लसीकरणासाठी वापरली जाणारी सेफ्टी नीडल किंवा सुरक्षित सुई (Safety Needle) आता भारतातदेखील लसीकरणासाठी वापरली जाणारी आहे. हिंदुस्थान सीरिंज अँड मेडिकल डिव्हाइस लिमिटेडने (HMD) नुकतीच डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडल (Dispoject Safety Needle) सादर केली आहे.

  देशात फ्रंटलाइन वर्कर्स (Frontline Workers) आणि आरोग्य कर्मचारी (Health Workers) नागरिकांना लस देण्यासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. एकीकडे लाखो लोकांचं दररोज लसीकरण सुरू असताना दुसरीकडे लसीकरणादरम्यान दुर्घटना किंवा दुखापत होण्याची शक्यताही वाढली आहे. यासोबत चुकूनही झालेल्या थोड्याशा बेसावधपणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसह मेडिकल वेस्ट (Medical Waste) गोळा करणाऱ्या सफाई कामगारांनाही गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे लसीकरणादरम्यान होणाऱ्या दुर्घटना किंवा दुखापतींपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचं संरक्षण करण्यासाठी भारतात तयारी सुरू झाली आहे.

  भारतात यामुळे गंभीर आजारांचा संसर्ग आणि दुखापती टाळता येणार आहेत.

  हे वाचा - भयंकर! रुग्णांचा जबडा सडू लागला; कोरोना, ब्लॅक फंगसनंतर आता नवं संकट

  'न्यूज 18'शी संवाद साधताना 'एचएमडी'चे व्यवस्थापकीय संचालक राजीव नाथ यांनी सांगितलं, की डिस्पोजेबल मेडिकल डिव्हाइसेस निर्मितीत जगातली तिसरी सर्वांत मोठी कंपनी असलेल्या एचएमडीने भारतासाठी प्रथमच डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडल तयार केली आहे. ही नीडल इंजेक्शनच्या पारंपरिक सुईपेक्षा वेगळी असून अधिक सुरक्षित आहे. या नीडलच्या निर्मितीसाठी 4 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. या नीडलच्या निर्मितीसाठी भारत, जपान, ब्रिटन, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या अभियंत्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.

  सर्वप्रथम भारतात सुरू असलेलं कोरोनाप्रतिबंधक लसीकरण अभियान, तसंच हिपॅटायटिस बी आणि एचआयव्ही एड्सबाधित रुग्णांसाठी या नीडलची निर्मिती केली जात आहे. भारतात या नीडलचा पुरवठा केल्यानंतर अन्य देशांमध्येही ती पाठवली जाणार आहे. या नीडलला जवळपास सर्व देशांकडून मागणी आहे. ही नीडल सर्वांत सुरक्षित मानली जाते. भारतात ही नीडल पहिल्यांदाच सादर करण्यात आली आहे, असं नाथ यांनी सांगितलं.

  डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडल नेमकी कशी आहे?

  राजीव नाथ यांनी सांगितलं, की नुकतीच तयार करण्यात आलेली डिस्पोजेक्ट सेफ्टी नीडल आधुनिक असून, त्यात शार्प इंज्युरी रोखण्याची सोय आहे. एकदा वापरल्यानंतर परत तिचा वापर होऊ नये यासाठी ती आपोआप डिसेबल होईल अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे. यामुळे ब्लड बॉर्न डिसीजचा (Blood Born Disease) धोका राहत नाही.

  या नीडलच्या वैशिष्टपूर्ण डिझाइनमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना नीडल स्टिकमुळे होणाऱ्या दुखापती टाळता येतील. ही नीडल वन हँडेड अॅक्टिव्हेटेड सेफ्टी मेकॅनिझमवर आधारित आहे. पारंपारिक नीडल्सच्या तुलनेत या नीडलची किंमत फार नाही. परंतु सुरक्षितता अधिक आहे. या नीडल 22 जी, 23 जी आणि 24 जीमध्ये उपलब्ध आहेत. या नीडल युजर फ्रेंडली असून वापरण्याची पद्धत आधीप्रमाणेच आहे.

  या नव्या नीडलमध्ये तीन भाग आहेत. त्यात सेफ्टी कव्हर, नीडल आणि नीडल हब यांचा समावेश होतो. सर्वप्रथम यावरचं आवरण काढून नीडल सीरिंजला लावली जाते. त्यानंतर शरीरावर टोचली जाते. वापर झाल्यानंतर त्यावरच्या आवरणातच ती पुन्हा झाकून घेतली जाते. यामुळे संसर्गाला कारणीभूत ठरणारा नीडलचा मुख्य बिंदू झाकला जातो आणि लॉकिंग मेकॅनिझम सुरू होतं. यानंतर ते सीरिंजद्वारे पृष्ठभागावर ठेवून कव्हरसह दुमडलं जातं आणि डिस्पोज केलं जातं.

  हे वाचा -  प्रेग्नंट महिलांना कशी घेता येईल कोरोना लस? मोदी सरकारने दिले दोन मार्ग

  2015मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या नीडलसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हिपॅटायटिस किंवा एचआयव्ही रुग्णांसाठी वापरल्या गेलेल्या नीडल्सचा दुसऱ्यांदा उपयोग केला जाणं, किंवा चुकून त्यास स्पर्श करण्यानं आजार फैलावू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी सेफ्टी नीडलचा वापर केला पाहिजे. नीडल स्टिकमुळे होणारी दुखापत (Injury) टाळण्यासाठी नीडलमध्ये शार्प इंज्युरी प्रोटेक्शनची सोय असणं गरजेचं आहे. यामुळे या नीडलचा वापर अमेरिकेत (America) सर्रास तर यूकेमध्ये (UK) गरजेनुसार केला जातो.

  First published:

  Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Injection, Vaccination