मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वत:च्याच चुकांचा केला अभ्यास; सर्वसाधारण कुटुंबातल्या अंकिता चौधरी कठोर मेहनतीने झाल्या IAS

स्वत:च्याच चुकांचा केला अभ्यास; सर्वसाधारण कुटुंबातल्या अंकिता चौधरी कठोर मेहनतीने झाल्या IAS

IAS अंकिता चौधरी यांनी यशासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे पहिल्या अपयशानंतर दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी चौदावा रँक मिळवला.

IAS अंकिता चौधरी यांनी यशासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे पहिल्या अपयशानंतर दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी चौदावा रँक मिळवला.

IAS अंकिता चौधरी यांनी यशासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे पहिल्या अपयशानंतर दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी चौदावा रँक मिळवला.

नवी दिल्ली, 12 जुलै: हरियाणा मधल्या एका छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या अंकिता चौधरी यांनी आपला मेहनतीच्या जोरावर आयएएस होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. अंकिता चौधरी (IAS Ankita Chaudhary) यांची परिस्थिती अतिशय साधारण होती मात्र, कशाचीही भीती न बाळगता त्यांनी शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांचं प्राथमिक शिक्षण हरियाणाच्या रोहतक जिल्ह्याच्या (Rohtak district of Haryanaमहम या ठिकाणावरुन झालं आहे. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी दिल्लीमधून (Delhi) आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची (UPSC Exam) तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नामध्ये अंकिता UPSC परीक्षेमध्ये नापास झाल्या.

(मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही?; या वास्तू Tips करतील कमाल)

त्यानंतर त्यांनी आपल्या चुकांचा अभ्यास केला आणि अभ्यासाची योग्य स्ट्रॅटेजी (Study Strategy) तयार केली. पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली. यावेळी योग्य अभ्यास पद्धतीमुळे त्यांनी 14 रँक मिळवला.

(कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय)

प्रचंड मेहनत आणि सतत प्रयत्न करण्याच्या स्वभावामुळे आपण हे यश मिळवलं असं IAS अंकिता चौधरी सांगतात UPSC परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अंकिता चौधरी यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्या म्हणतात, ‘आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट असायला हवं आणि त्या दृष्टीने आपण अभ्यासाची आखणी करायला हवी. ठराविक पुस्तकांचा योग्य पद्धतीने अभ्यास केला आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर यश मिळतं’.

(UPSC टॉपर अक्षत जैन यांनी दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश; अशी होती Study Strategy)

याशिवाय अंकिता यांनी उजळणी करण्यावर आणि नोट्स तयार करण्यावरही भर देण्यास सांगितलं आहे. मुख्य परीक्षेसाठी उत्तर लिहिण्याची प्रॅक्टीस करण आवश्यक असल्याचं अंकिता चौधरी आवर्जून सांगतात.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success stories