कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय
कोरानाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू झालेल्या नाहीत. स्पर्धा परिक्षांच्या बाबतीही अनिश्चितता आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत काय करायचं? यावर सायकलॉजिस्टचं काय मत आहे ? जाणून घेऊ यात.
कोरोनामुळे शिक्षण आणि करियर यांच्याबाबतीत अनश्चितता निर्माण झाली असली तरी, त्यावर लवकरचं सोल्युशन मिळेल. जी परिस्थिती भारतात आहे, ती परिस्थिती संपूर्ण जगात आहे.
2/ 9
लसीकरण सुरु झालं आहे त्यामुळे आशादायी चित्र आहे. म्हणून निराश होऊ नका. सरकार देखील या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. त्यामुळे या काळात पॉझिटीव्ह विचार आपल्याला तारू शकतात.
3/ 9
सरकारने नमोदर्पण नावाचा एक करियर प्रोग्राम सुरु केला आहे. त्याचा फायदा घेऊ शकता. या परिस्थितीतही आपल्याकडे करियरचे पर्याय खुले आहेत. त्यांचा विचार करा. याशिवाय तणाव कमी करण्यासाठी काही टिप्सही वापरु शकता.
4/ 9
करियर ही अनेक वर्षांच्या मेहनतीने घडणारी गोष्ट आहे. एक किंवा दोन वर्षांमुळे त्यावर परिणाम होऊ देऊ नका. उलट मिळालेला वेळ काहीतरी नवीन शिकण्यात घालवा.
5/ 9
सगळीकडे निराशा पसरलेली आहे. पुढे काय होणार याचा विचार सगळे करत आहेत. त्यामध्ये गुंतू नका. त्याऐवजी काहीतरी प्रोडक्टीव्ह विचार करायला सुरुवात करा. त्यानेच या काळात फायदा होणार आहे.
6/ 9
शाळा, कॉलेज बंद आहेत,तरी ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. पुढे जाऊन नव्या संधी मिळतील याचा विचार करा. फोन, व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींबरोबर बोला. विचारांची देवाणघेवाण करा.
7/ 9
केवळ एकाच्याच नाही तर,सगळ्यांच्याच करियरवर या परिस्थितीचा परिणाम होत आहे. रियलिस्टीक ऍप्रोचने नवीन सुरुवात कशी करायची याचा विचार करा.
8/ 9
कोरोनामुळे घरातच रहावं लागत असलं तरी, घरामध्ये राहुनही नवीन कोर्स करता येऊ शकतात. अनेक ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्याची माहिती घ्या. एखादा छोटा कोर्स सुरु करुन तुम्ही सुरूवात करु शकता.
9/ 9
कोरोनामुळे लहान मोठ्या सगळ्यांवरच अनिश्चिततेचं सावट आहे. पण कोणीही थांबत नाही. नवीन सुरुवात सगळ्यांनाच करावी लागते. त्यामुळे हा वेळ स्वत: ला द्या. स्वत:शी बोला.