मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हवामान बदलाचा फटका, 'हा' मोठा देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती!

हवामान बदलाचा फटका, 'हा' मोठा देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती!

आता हा प्रवाह फारच कमी झाला आहे. परिणामी ब्रिटनमधील तापमान कमी होत चालले आहे.

आता हा प्रवाह फारच कमी झाला आहे. परिणामी ब्रिटनमधील तापमान कमी होत चालले आहे.

आता हा प्रवाह फारच कमी झाला आहे. परिणामी ब्रिटनमधील तापमान कमी होत चालले आहे.

  मुंबई, 06 ऑगस्ट : सध्या ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) ही जगापुढील खूप मोठी समस्या आहे. जगातील सर्वच देशांना त्याला तोंड द्यावं लागतं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील जवळजवळ प्रत्येक देश परिणाम भोगत आहे. हवामानातील बदलापासून (Change In Climate) ते अनेक प्राण्यांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. जगातील काही देशांना मात्र ग्लोबल वॉर्मिंगची फारच मोठी झळ सोसावी लागत आहे. यामुळे त्यांच्या अस्तित्वावरचं धोका निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटनचा सुद्धा समावेश होतो. जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, सध्या वेगाने हवामानामध्ये बदल होत आहे. त्यामुळे येत्या काळात ब्रिटन (britain) बर्फाखाली जाऊ शकतो.

  डॉ निकलस बॉयर्स (Dr Niklas Boers) यांनी म्हटलंय की, गेल्या एक हजार वर्षात प्रथमच, आखाती (Gulf) देशातून युरोपला येणारे गरम वारे सर्वात कमकुवत बनले आहेत. अटलांटिक सर्क्युलेशनमुळेच (Atlantic Circulation) युरोपमध्ये उबदार हवा येते.

  VIDEO - या मुंबई पोलिसाच्या डान्सचा जलवा पाहाच; दबंग सलमानही यांच्यासमोर फेल

  पण आता हा प्रवाह फारच कमी झाला आहे. परिणामी ब्रिटनमधील तापमान कमी होत चालले आहे. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच ब्रिटन बर्फाखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवसृष्टी संपू शकते. असा दावा या नामवंत शास्त्रज्ञाने आपल्या अभ्यासातून केला आहे.

  काही वर्षामध्ये होईल मोठा बदल

  बॉयर्स यांनी म्हटलंय की, आखातामधून वाहणाऱ्या गरम हवेच्या प्रवाहात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे युरोपचं तापमान खालावत चाललं आहे. याबाबत गेल्या वर्षीच नॉर्थअंबरलँड विद्यापीठानं (University of Northumberland) इशारा दिला होता. त्यानुसार आगामी 30 वर्षे पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतील. म्हणजेच येणारा काळ पृथ्वीसाठी मिनी आईस एज (mini ice age) असेल असं त्यांनी म्हटलं आहे. या काळात तापमान अत्यंत कमी होईल. जगाला -50 डिग्री सेल्सियस एवढ्या कमी तापमानाचा सामना करावा लागू शकतो.

  सूर्याचेही होईल तापमान कमी

  या दाव्यामध्ये सूर्याबद्दल (Sun) सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सूर्याच्या तापमानातही मोठी घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सूर्याची उष्णताही कमी होत आहे. येत्या काळात सूर्याची उष्णता आणखी कमी झाल्याने ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. परिणामी ब्रिटन बर्फाखाली गोठून जाईल असं या दाव्यामध्ये म्हटलं गेलं आहे. या दाव्यानंतर लोकांनी घाबरून जाऊ नये असं अनेक बॉयर्स यांनी सांगितलं आहे. अनेकांनी मिनी आइस एजला अफवासुद्धा म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा बदल झाला तर, तो फक्त ब्रिटनमध्येचं होईल असं नाही. केवळ एकच देश बर्फाखाली जाईल असं होणार नाही.

  खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट

  शास्त्रज्ञाने आपल्या दाव्यातून हा गंभीर धोका सांगितला असला तरी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीवर ठोस पावले उचलली तर नक्कीच हा धोका कमी करता येऊ शकतो.

  First published:
  top videos

   Tags: Britain