जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेग्नन्सीमध्ये जास्त प्रमाणात हळद खाणे हानिकारक आहे का? पाहा काय म्हणतात डॉक्टर

प्रेग्नन्सीमध्ये जास्त प्रमाणात हळद खाणे हानिकारक आहे का? पाहा काय म्हणतात डॉक्टर

प्रेग्नन्सीमध्ये जास्त प्रमाणात हळद खाणे हानिकारक आहे का? पाहा काय म्हणतात डॉक्टर

भारतात हळदीशिवाय भाजीची कल्पना करता येते का? हळदीशिवाय कोणाचे लग्न होऊ शकते का? अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही, परंतु काही बाबतीत हळदीचे सेवन चांगले आहे की नाही याबद्दल अनेक प्रश्न आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑक्टोबर : भारतीय मसाल्यांमध्ये हळदीशिवाय कोणत्याही भाजीची कल्पना करता येत नाही. आता हळद जगभरात पोहोचली आहे. भारतीय आयुर्वेदात, हळदीचा उपयोग खूप काळापासून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आधुनिक संशोधनात असा दावाही करण्यात आला आहे की हळदीमध्ये असलेल्या कर्क्यूमिन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हळद दाहक-विरोधी आणि जंतुनाशक औषध म्हणून काम करते. काही संशोधनात असेही म्हटले आहे की हळदीमध्ये कर्करोग विरोधी तत्व देखील असते, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. इतके फायदेशीर असूनही हळदीचे काही दुष्परिणामही आहेत. हळद जास्त प्रमाणात खाल्यास काय होते? किंवा प्रेग्नन्सीदरम्यान महिलांनी हळदीचे सेवन करावे का? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

बिर्याणीतल्या मसाल्यांमुळे पुरुषांचा सेक्स ड्राइव्ह खरंच कमी होतोय का?

हळदीचे दुष्परिणाम WebMD वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, हळदीचे कमी प्रमाणात सेवन करण्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, परंतु त्याचे अनेक फायदे आहेत. 8 ग्रॅम कर्क्युमिन दोन महिने रोज घेतले तरी काही नुकसान होत नाही. खरे तर हळदीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. काही लोक थोडी चक्कर येणे, मळमळ किंवा अतिसाराची तक्रार करतात.

News18लोकमत
News18लोकमत

एका अहवालानुसार, फेस वॉश, त्वचा साफ करणे, तोंड साफ करणे इत्यादींमध्ये आरोग्यासाठी कोणतेही नुकसान नाही, परंतु काही परिस्थितींमध्ये हळद जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. प्रश्न असा आहे की कोणतीही व्यक्ती 8 ग्रॅमपेक्षा जास्त हळद का खाईल? लोक क्वचितच 2 ग्रॅम हळद खातात. गर्भवती महिलांसाठी हळद हानिकारक आहे का? WebMD नुसार, हळद जास्त प्रमाणात खाल्ल्यास गर्भवती महिलांना नुकसान होऊ शकते, त्यामुळे ती जास्त प्रमाणात घेऊ नये. मॅक्स हेल्थकेअर साकेतच्या क्लिनिकल न्यूट्रिशन विभागाच्या उपप्रमुख डॉ. रसिका माथूर यांनी सांगितले की, असा कोणताही अभ्यास नाही, ज्यामध्ये असे ठामपणे म्हणता येईल की हळद खाल्ल्याने प्रेग्नन्सीवर परिणाम होतो. त्यांनी सांगितले की, असेही आपण हळद जास्त खात नाही. भाजीमध्ये हळद जास्त झाली असेल तर भाजी खाल्लीच जात नाही. त्यामुळे हळद खाल्ल्याने नुकसान होते, यात तथ्य नाही. याउलट हळदीचे अनेक फायदे आहेत. हळद जंतुनाशक आहे. तसेच अनेक समस्यांसाठी वापरले जाते.

Colorful Vegetable Benefits : काळा लसूण-गाजर, जांभळे टोमॅटो-फ्लॉवर; विचित्र रंगांच्या भाज्यांचे अद्भुत फायदे

किडनी स्टोनमध्ये हळद खाणे टाळावे वेबएमडीच्या बातमीत असेही सांगण्यात आले आहे की, ज्यांना पित्त मूत्राशयाची समस्या आहे, म्हणजे किडनी स्टोन, त्यांनी हळद खाऊ नये, कारण यामुळे समस्या उद्भवू शकतात. मात्र यालाही शास्त्रीय आधार नाही. तसे हळदीचे गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात