या रंगीत भाज्यांच्या फायद्यांमुळे त्यांना सुपरफूड म्हणले जाते. या भाज्या पोषणाचे पॉवरहाऊस आहेत. तुमचे आरोग्य सांभाळण्यासाठी या भाज्या खूप फायदेशीर ठरतात.
काळा लसूण : ताज्या लसणाच्या तुलनेत काळा लसूण जास्त तिखट नसतो. हा लसूण ऍलर्जी, अँटी-डायबिटीज, अँटी-ऍलर्जीकी आहे. त्याचबरोबर हा लसूण शरीरातील जळजळ कमी करतो.
पिवळी झुचिनी : ही नॉन-स्टार्ची भाजी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी 6, मॅंगनीज, पोटॅशियम आणि पायरीडॉक्सिनने समृद्ध असते. ही फायबरमध्ये भरपूर असते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
काळे गाजर : काळे गाजर अँथोसायनिन्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. कॅल्शियम, लोह आणि जस्त या खनिजांनी समृद्ध आहे. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून शरीराला विविध कर्करोगांपासून वाचवण्यापर्यंत फायदेशीर आहे.
जांभळे टोमॅटो : याची चव टोमॅटोसारखीच असते आणि लाल टोमॅटोच्या तुलनेत त्याची शेल्फ-लाइफ जास्त असते. हे टोमॅटो अँथोसायनिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत.
जांभळी फुलकोबी : ही कोबी अँटिऑक्सिडंट्समध्ये भरपूर असल्याने शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी मदत करते. तसेच अँथोसायनिन्सने समृद्ध असून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, जीवघेणा कर्करोगाशी लढण्यास मदत करते.