Home /News /lifestyle /

Hair care: पांढऱ्या केसांना फक्त डाय करून भागणार नाही; आहारात हे पदार्थ घेताय का पाहा

Hair care: पांढऱ्या केसांना फक्त डाय करून भागणार नाही; आहारात हे पदार्थ घेताय का पाहा

केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिक कारणांव्यतिरिक्त, यामध्ये तणाव, धूम्रपान, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील कारण असू शकते. केस अकाली पांढरे होण्याचे टाळण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

  मुंबई, 07 जुलै : अवेळी केस पांढरे होणे ही आता एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. तरुणांनाही लहान वयातच या समस्येचा सामना करावा लागतो. केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि पुरेसा पौष्टिक आहार न घेणे. केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थ खूप उपयोगी ठरू शकतात. केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिक कारणांव्यतिरिक्त, यामध्ये तणाव, धूम्रपान, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील असू (Superfoods To Avoid Premature Greying) शकते. केस अकाली पांढरे होण्याचे टाळण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, 8 सुपर फूड्स आहेत, जे केस अकाली पांढरे होण्याचा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आपल्या आहारात या 8 सुपर फूडचा समावेश करा - 1. हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्या आरोग्य निरोगी राखण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यामुळेच त्यांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा, सॅलड म्हणून भाज्या खाणे उत्तम आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा फायदा होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक-मेथी इ, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोलीसह इतर भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फोलेट यासह इतर पोषक घटक असतात जे केस निरोगी ठेवतात. 2. डार्क चॉकलेट - केस निरोगी ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट हे देखील सुपरफूड्सपैकी एक आहे. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते, जे केस अकाली पांढरे होण्याचे कारण असू शकतात. डार्क चॉकलेटमध्येही तांबे मुबलक प्रमाणात असते, जे मेलेनिनचे घटक वाढवण्यास मदत करते. 3. दुग्धजन्य पदार्थ – केस निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. विशेषत: दही हे प्रोबायोटिक असण्यासोबतच अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. 4. अंडी – अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. केस मजबूत ठेवण्यासाठी अंड्याचे सॅलडही खाल्ले जाते. त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 देखील आहे, व्हिटॅमिन बी 12 कमी असणं हे केस अकाली पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण आहे. केसांच्या मजबुतीसाठी अंड्यातील फक्त पांढरा भाग खाण्याऐवजी संपूर्ण अंडे खावे. 5. सोयाबीन - आहारात सोयाबीनचाही समावेश करा. सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्याचे आंबवलेले प्रकार शरीराला अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स देतात, जे केस अकाली पांढरे होण्याची समस्या दूर करण्यात मदत करतात. हे वाचा - काय सांगता? दारूचा स्त्री-पुरुषांवर होतो वेगवेगळा परिणाम? कुणाला चढते लवकर? 6. कडधान्ये – शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या कडधान्यांचे सलाड खायला दिले जाते. केसांच्या मजबुतीसाठीही हात उपाय लागू होतो. कडधान्ये व्हिटॅमिन B9 चा उत्कृष्ट स्रोत आहेत. हे केसांच्या वाढीसाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. 7. मशरूम - पांढऱ्या केसांचा वेग कमी करण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश करा. त्यात तांबे पुरेशा प्रमाणात असते, ज्यामुळे मेलेनिन वाढते. मेलेनिन हे केस आणि त्वचेच्या रंगासाठी जबाबदार घटक आहे. मेलेनिनची कमतरता हे केस झपाट्याने पांढरे होण्याचे एक कारण आहे. हे वाचा - तुळशीला पाणी घालताना या चुका कधीच नका करू; कसलाच फायदा नाही मिळत 8. आंबवलेले पदार्थ – ज्यांना केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येने ग्रासले आहे त्यांच्यासाठी आंबवलेले पदार्थ खूप फायदेशीर ठरू शकतात. आंबलेल्या पदार्थांमध्ये इडली, डोसा लोणची आणि प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश होतो जे पचन सुधारतात. चांगले पचन बायोटिन पातळी सुधारते. बायोटिन घटक आपल्या केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यावर परिणाम करतात.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health Tips, Woman hair

  पुढील बातम्या