Home /News /lifestyle /

तुळशीला पाणी घालताना या चुका कधीच नका करू; कसलाच फायदा नाही मिळत

तुळशीला पाणी घालताना या चुका कधीच नका करू; कसलाच फायदा नाही मिळत

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

    मुंबई, 07 जुलै : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील बहुतेक लोकांच्या घरात तुळशीचे रोप नक्कीच लावले जाते. धार्मिक शास्त्रांमध्येही तुळशीच्या रोपाला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि औषधी मानले जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत भोपाळचे पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली (Tulsi la pani dyanyache Niyam) आहे. एकादशीला तुळशीला पाणी देऊ नये - एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या येऊ शकतात. याशिवाय या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते, त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे, असे मानले जाते. - न शिवलेले कपडे (वस्त्र) पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे. म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे. शिवलेले कपडे परिधान करून तुळशीला पाणी घालण्याचा फारसा फायदा होत नाही, असे म्हणतात. - सूर्योदयावेळी जल अर्पण करा धार्मिक मान्यतांनुसार, तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. असे मानले जाते की सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम जास्त पाणी देऊ नका - तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात. यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार दक्षिण दिशेला तुळशी ठेवू नये- वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच तुळशीला या दिशेला ठेवल्यानेही वाईट परिणाम होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या