नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : आता हिवाळा ऋतू सुरू झाला असून वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला आहे. त्यात दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (4 ऑक्टोबर 2021) दिवाळी आली आहे. त्यामुळे नोकरदारांना सलग सुट्ट्या मिळण्याची संधी आहे. अशा स्थितीमध्ये हिमालयातील (Himalaya) आणि इतर ठिकाणच्या लहान-मोठ्या शिखरांवर ट्रेकिंग (Trekking) करण्यासाठी नक्कीच मजा येईल. अनेक ट्रेकर्स हिवाळ्यामध्ये हिमालयात जाऊन ट्रेकिंगचा आनंद लुटतात. हिवाळ्यात हिमालयातील ट्रेकिंग फील्ड पूर्णपणे बदलून जातात. तुमच्या आजूबाजूला दूरदूरपर्यंत फक्त बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि हिमनद्या दिसतात. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असे अनेक अद्भुत ट्रेकिंग स्पॉट्स आहेत, जे अजूनपर्यंत अनेकांच्या नजरेत आलेले नाहीत. अशा ठिकाणी फिरायला जाऊन दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्याची तुमची इच्छा असेल तर भारतातील टॉप ट्रेकिंग पॉईंटविषयी नक्की माहिती करून घ्या. देवरिया ताल-चंद्रशिला घनदाट जंगलं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यांना वेळ घालवायला आवडतं त्यांच्यासाठी उत्तराखंडमधील देवरिया ताल-चंद्रशिला (Chandrashila) ट्रेक हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही यापूर्वी कधीही हा ट्रेक केला नसेल आणि तुम्हाला हिमालयातील ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. हे ठिकाण एकदम हिमालयात येत नाही. वाचा : जास्त अंतर धावायचं की वेगानं धावायचं? यातलं काय असतं अधिक फायद्याचं? केदारकंठा (Kedarkantha) हिमालयाच्या बाहेरील बाजूस उत्तराखंडमध्ये केदारकंठा हे ठिकाण आहे. हा भारतातील सर्वात प्रसिद्ध ट्रेक असून हिवाळ्यात तिथे अनेक लोक जातात. हिवाळा सुरू झाला की येथील परिसर पूर्णपणे बर्फानं व्यापतात. सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ याठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यामध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. कुआरी पास ट्रेक भारतातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेल्या नंदा देवी पर्वताला पूर्ण नजरेखालून खालण्याची संधी हा कुआरी पास ट्रेक तुम्हाला उपलब्ध करून देतो. याठिकाणा वरून येथून तुम्ही द्रोणागिरी पर्वत आणि एलिफंट (हाथी) पर्वताचं विहंगम दृश्य देखील पाहू शकता. कुआरी पास ट्रेक उत्तराखंडमधील जोशीमठापासून सुरू होतो. गोचला सिक्कीमच्या युकसोम प्रदेशात वसलेल्या गोचला येथून अनेक मोठ्या पर्वतांचं दर्शन होतं. याठिकाणी ट्रेकला गेल्यानंतर तुम्हाला केवळ कांचनजंगा पर्वतच नाही तर इतर 14 उंच शिखरंदेखील दिसतील. हे ठिकाण नेपाळमधील सर्वात मोठ्या ट्रेकपासून अगदी जवळ आहे. वाचा : हॉटेल, ट्रॅव्हल कंपनीमुळे Honeymoon ची लागली वाट; संतप्त Couple ने घेतला सॉलिड बदला दायरा बुग्याल (Dayara Bugyal) या ट्रेकबद्दल अनेक लोकांना अद्याप माहिती नाही. आत्तापर्यंत फार कमी लोकांनी दायरा बुग्याल हा ट्रेक पाहिला असेल. हा ट्रेक उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून जवळ असलेल्या रथलपासून सुरू होतो. दायरा बुग्यालचा नजारा पाहून नक्कीच तुम्हाला आनंद होईल. याठिकाणी ट्रेकिंग करणं सोप आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबासह या ट्रेकचा आनंद घेऊ शकतो. गोमुख तपोवन हा अद्भुत ट्रेक तुम्हाला गंगा नदीचं उगमस्थान असलेल्या गोमुख ग्लेशियरवर घेऊन जातो. इतकंच नाही तर या ट्रेकमध्ये तुम्हाला शिवलिंग पर्वताच्या जवळ जाण्याची देखील संधी देतो. तपोवनातून तुम्हाला मेरू पर्वताचं सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. हे ठिकाण उत्तराखंडमधील गंगोत्री येथे आहे. बुरान व्हॅली अनेक लोक बर्फवृष्टीचा हंगाम संपल्यानंतर बुरान व्हॅलीकडे जातात. मात्र, काही ट्रेकर्स ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासूनचं या ट्रेकिंग पॉईंटला भेट देतात. कारण, ऑगस्टमध्ये येथील घनदाट हिरवीगार जंगलं विविध रंगांनी व्यापली जातात. या ठिकाणाच्या नैसर्ग सौंदर्यामध्ये इतकी भर पडते की ही जागा सोडाविशी वाटत नाही. हा ट्रेक हिमाचल प्रदेशात आहे. वाचा : हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं का आहे गरजेचं; वाचा त्याचे सर्व फायदे हर की दून (Har ki Doon) उत्तराखंडमधील कोटगावमध्ये असलेल्या हर की दून हा ट्रेक आतापर्यंत फार कमी लोकांनी एक्सप्लोर केला आहे. या भागात तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतील. याठिकाणी तुम्हाला माकडाची एक खास प्रजाती, काळी हरणं, अस्वल आणि रेनडिअर सारखे प्राणीही पाहायला मिळतील. हे ठिकाण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. संदकफू ट्रेक (Sandakphu) सांडकफू ट्रेक हा पश्चिम बंगालमधील जोभारी येथे आहे. येथून तुम्ही जगातील चार सर्वोच्च पर्वत (माउंट एव्हरेस्ट, मकालू, माउंट कांगचनजंगा आणि माउंट ल्होत्से) एकाचवेळी पाहू शकता. येथे ट्रेकिंग करताना सिंगलिला नॅशनल पार्कच्या जंगलांचाही आनंद लुटता येईल. गिदारा बुग्याल गिदारा बुग्याल हे देखील ट्रेकिंगच एक उत्तम सर्कल आहे. या सर्कलमध्ये तुम्हाला उंचीवरील सर्वात मोठे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. येथील गवताळ प्रदेश दायरा बुग्यालपेक्षाही मोठी आहेत. खूप कमी लोकांना या ट्रेकबद्दल माहिती आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसोबतच कॅम्पिंगचाही आनंद घेऊ शकता. हा ट्रेक उत्तराखंडमधील भंगेली येथे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.