Home /News /heatlh /

boiled egg in winter : हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं का आहे गरजेचं; वाचा त्याचे सर्व फायदे

boiled egg in winter : हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं का आहे गरजेचं; वाचा त्याचे सर्व फायदे

Health benefits of boiled egg in winter: अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये असलेलं व्हिटॅमिन डी (Vitamin D) सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. रोज उकडलेलं अंडं खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. अंडी शरीराला खूप लवकर ऊर्जा पुरवतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 ऑक्टोबर : अंडी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत आहे. अंड्यापासून अनेक पाककृती बनवता येतात. उकडलेल्या अंड्यांमध्ये हेल्दी फॅट (Healthy Fat) असतं. ते वजन वाढू देत नाही. याशिवाय, प्रथिनं मुबलक प्रमाणात असल्यामुळं शरीरातील तुटलेल्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी याचा उपयोग होतो. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये असलेलं व्हिटॅमिन डी (Vitamin D) सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. रोज उकडलेलं अंडं खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. अंडी शरीराला खूप लवकर ऊर्जा पुरवतात. अंड्याचं सेवन त्वचा, डोळे आणि केसांसाठीही (Health benefits of boiled egg in winter) फायदेशीर आहे. अंड्यामधील पोषक घटक हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, एका उकडलेल्या अंड्याचं सेवन केल्यानं 77 कॅलरी ऊर्जा मिळू शकते. याशिवाय, एका उकडलेल्या अंड्यामध्ये 0.6 ग्रॅम कर्बोदकं, 5.3 ग्रॅम फॅट, 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, 2 ग्रॅम मोनोसॅच्युरेटेड फॅट, 212 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल, 6.3 ग्रॅम प्रथिनं, 6 टक्के व्हिटॅमिन ए, 15 टक्के व्हिटॅमिन बी 2 असतं. नऊ टक्के व्हिटॅमिन बी 12, 7 टक्के व्हिटॅमिन बी 5, 86 मिलीग्रॅम फॉस्फरस आणि 22 टक्के सेलेनियम आढळतात. थंडीच्या काळात शरीराचं अंतर्गत तापमान कमी होत असल्यानं ते वाढवण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते. अंड्यामुळे ही कमतरता लवकर भरून निघते. अंड्याचे फायदे हृदयाचं आरोग्य अंड्यामध्ये भरपूर कोलेस्टेरॉल असतं. परंतु, ते शरीरासाठी चांगलं कोलेस्टेरॉल असल्यानं हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक नसतं. त्यामुळं वाईट कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यामुळंच अंड्यांमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हे वाचा - Mens Health : पुरुषांनी दुधासोबत दररोज आहारात या गोष्टीचा करावा समावेश; आहेत अनेक फायदे डोळे आणि मेंदू अंड्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. अंड्यांमध्ये कोलीन हे रसायन आढळतं. ते मज्जासंस्था मजबूत करणं आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतं. अंड्यातील 'अ' जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. प्रोटीनची कमतरता भरून काढतं एका अंड्यामध्ये ६ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनं असतात. याचं नेहमी सेवन केल्यानं शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला शक्ती मिळेल. शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्याचं काम प्रथिनं करतात. हे वाचा - दिवाळीत Beautiful दिसायचं आहे? एथनिक लूक हवाय?, मग नक्की या अ‍ॅक्सेसरीजचा करा वापर अंडी लोहाची कमतरता दूर करतात अंड्यांमध्ये लोहही मुबलक प्रमाणात आढळतं. अंड्याच्या सेवनानं शरीराचा थकवा कमी होतो. जर तुम्हाला चक्कर येत असेल, तर यासाठी अंडी खूप उपयुक्त आहेत. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्यातील पिवळा भाग जरूर खा. रोगप्रतिकारशक्ती वाढते- रोज एक उकडलेलं अंडं खाल्ल्यानं शरीर मजबूत राहतं. अंड्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि अनेक पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ते सर्व प्रभावी असतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Winter session

    पुढील बातम्या