मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Running Benefits : जास्त अंतर धावायचं की वेगानं धावायचं? यातलं काय असतं अधिक फायद्याचं?

Running Benefits : जास्त अंतर धावायचं की वेगानं धावायचं? यातलं काय असतं अधिक फायद्याचं?

अनेक जण फिटनेससाठी व्यायामाकडे वळत आहेत. मात्र, फिटनेस मिळवण्यासाठी व्यायामाची तीव्रता (Intensity) आणि व्यायामाचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम (Volume) यांबाबत संभ्रम असतो.

अनेक जण फिटनेससाठी व्यायामाकडे वळत आहेत. मात्र, फिटनेस मिळवण्यासाठी व्यायामाची तीव्रता (Intensity) आणि व्यायामाचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम (Volume) यांबाबत संभ्रम असतो.

अनेक जण फिटनेससाठी व्यायामाकडे वळत आहेत. मात्र, फिटनेस मिळवण्यासाठी व्यायामाची तीव्रता (Intensity) आणि व्यायामाचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम (Volume) यांबाबत संभ्रम असतो.

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : सध्याच्या काळात बदललेली जीवन शैली (Life Style), व्यायामाला वेळ नसणं अशा अनेक गोष्टींमुळे शारीरिक व्याधी वाढत आहेत. त्यामुळे अनेक जण फिटनेससाठी व्यायामाकडे वळत आहेत. फिटनेस मिळवण्यासाठी व्यायामाची तीव्रता (Intensity) आणि व्यायामाचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम (Volume) यांबाबत संभ्रम असतो. जर्नल ऑफ फिजिऑलॉजीच्या एका अंकातही संशोधकांच्या दोन गटांनी यावरून परस्परविरोधी भूमिका मांडल्या आहेत. मानवी स्नायूंच्या मायटोकॉन्ड्रियल घटकामध्ये वाढ होण्यासाठी व्यायामाच्या व्हॉल्यूमपेक्षा तीव्रता अधिक महत्त्वाची आहे. या मुद्द्यावरून वेगानं धावणं महत्त्वाचं की जास्त वेळ धावणं महत्त्वाचं यावर वादविवाद करण्यात आला आहे.

उच्च तीव्रतेच्या व्यायाम प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असणारे मॅकमास्टर विद्यापीठाचे (McMaster University) मार्टिन गिबाला (Martin Gibala) यांचा तीव्रतेच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या गटात समावेश आहे. कॅलगरी विद्यापीठातले डॉक्टरेटचे विद्यार्थी लॉरेन स्केली आणि त्यांचे प्रशिक्षणार्थी मार्टिन मॅकइनिस यांचाही या गटात समावेश आहे. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखात त्यांनी दोन मुख्य दावे केले आहेत. एक म्हणजे जेव्हा व्यायामाची तुलना करताना ती समान प्रमाणात करतात, पण जे अधिक तीव्र आणि कमी व्हॉल्यूमचं व्यायाम प्रशिक्षण घेतात त्यांना मायटोकॉन्ड्रियल ( mitochondrial) घटकाच्या वाढीचा सर्वांत मोठा फायदा होतो. दुसरं म्हणजे तीव्रता हा महत्त्वाचा घटक आहे. कारण बहुसंख्य जण जास्त प्रमाणातल्या व्यायामाचं प्रशिक्षण घेण्यासाठी लागणारा अधिक वेळ (Time) घालवण्यास तयार नसतात.

यावर प्रतिवाद करताना ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातले डेव्हिड बिशप, झेव्हियर बोटेला आणि त्यांचे माजी सहकारी मोनाश विद्यापीठातील सीझर ग्रॅनाटा यांनी 56 अभ्यासांचं एकत्रित विश्लेषण करून व्यायामाचं प्रमाण अर्थात व्हॉल्यूम आणि माइटोकॉन्ड्रियल घटकातला बदल यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. या अभ्यासात व्यायामाची तीव्रता आणि मायटोकॉन्ड्रियल बदल यात कोणताही महत्त्वपूर्ण संबंध आढळला नाही, त्यावरून व्हॉल्यूम हा मुद्दा बदलता असल्याचं स्पष्ट होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

मायटोकॉन्ड्रियल बदल कसे मोजतात, यावर दोन्ही गटांत मतमतांतर आहे. गिबालाच्या टीमच्या मते मानवी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि विविध रेणूंची उपस्थिती शोधून मायटोकॉन्ड्रियल घटकांतली वाढ मोजली पाहिजे. बिशप यांच्या टीमचा असा युक्तिवाद आहे, की मायटोकॉन्ड्रियाचं मोजमाप दिशाभूल करणारं असू शकतं. म्हणून प्रत्यक्ष पद्धतीनं (उदाहरणार्थ, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरून) करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला अधिक महत्त्व दिलं पाहिजं, भले हा प्रयोग माणसांऐवजी उंदरांवर केला असला तरी गिबाला यांच्या मते , वेळेचा अभाव असणाऱ्या सध्याच्या आयुष्यात लोकांना त्यांचं फिटनेसचं ध्येय साध्य करण्यासाठी व्यायामाच्या प्रत्येक मिनिटात जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. तरच लोक त्यांचं फिटनेसचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतील. उच्च-तीव्रतेच्या व्यायामामुळे तुम्हाला व्यायामाच्या प्रत्येक मिनिटाला मायटोकॉन्ड्रियाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल, हा मुद्दा बिशप आणि त्यांचे सहकारी मान्य करतात.

हे वाचा - COVID-19 in India तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिला इशारा

परंतु कार्यक्षमता आणि परिणामकारकता या दोन भिन्न गोष्टी आहेत, असं बिशप यांचं म्हणणं आहे. स्पर्धात्मक खेळांच्या संदर्भात विचार केला तर ही स्पर्धा सर्वांत वेगवान कोण आहे हे पाहण्यासाठी असते, कोणी प्रशिक्षणासाठी कमी वेळ घालवला यासाठी नसते. प्रत्येक मिनिटाच्या आधारावर केली जाणारी तुलना काहीशी दिशाभूल करणारी असू शकते, असंही त्याचं म्हणणं आहे. गिबाला यांच्या 'एक मिनिट व्यायाम' नावाच्या पुस्तकात, तीन वेळा प्रत्येकी 20 सेकंदांच्या कालावधीत सायकलिंगसह दोन मिनिटं सोपं सायकलिंग करण्याच्या व्यायामाचा उल्लेख आहे. त्यापूर्वी वॉर्म-अप आणि व्यायामानंतर कूल-डाउनही आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. वेळेची कमतरता हा व्यायामातला खरोखरच एक महत्त्वाचा अडथळा आहे का, की ते नावडती गोष्ट टाळण्याचं एक निमित्त आहे, असंही यावर विचारण्यात आलं आहे.

प्रत्यक्षात तीव्रता आणि व्हॉल्यूम यापैकी एकच परिमाण सर्वांत महत्त्वाचं म्हणून मान्य करणं फारसं उपयुक्त नाही, असं वाटतं. मेयो क्लिनिकचे फिजिओलॉजिस्ट मायकल जॉयनर सांगितलेल्या एका उदाहरणानुसार, 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 5000 मीटरची शर्यत बॉब शूलने जिंकली. त्याने दिवसातून दोनदा व्यायामातून विश्रांती घेऊन केलेल्या वर्कआउट्सना महत्त्व दिलं होतं. या स्पर्धेचा उपविजेता हॅराल्ड नॉरपोथ होता, ज्यानं आठवड्याभरात 100 मैल अंतर पार करण्याचा व्यायाम केला होता. कांस्यपदक बिल डेलिंगरने मिळवलं. त्याने व्यायामातल्या विश्रांतीसह दीर्घ अंतर आणि कमी अंतर धावण्याच्या सरावाचा समावेश प्रशिक्षणात केला होता. तिघांनी अगदी काही सेकंदांच्या फरकाने ही स्पर्धा जिंकली होती. याच शर्यतीत रॉन क्लार्कही होता. त्याने मध्यम गतीने धावण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं, की सर्वांचं उद्दिष्ट एकच होतं; पण त्यासाठीचे मार्ग वेगवेगळे होते.

हे वाचा - WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक? जाणून घ्या कारणं…

याचप्रमाणे गिबाला आणि बिशप यांच्या मते व्यायामाची तीव्रता आणि व्हॉल्यूम या दोन्ही बाबी माइटोकॉन्ड्रियाला चालना देण्यासाठी आणि सहनशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्हाला यातली कोणती बाब सर्वांत महत्त्वाची वाटते ते तुमच्या ध्येयांवर आणि तुमच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला शर्यतीत भाग घेऊन शर्यत जिंकायची आहे की तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं आहे? काही जणांना लांब अंतरापर्यंत पण आरामशीर धावायला आवडतं किंवा हायकिंग आवडते, तर काही जणांना ते अंतर वेगाने पूर्ण करायचं असतं. तुम्ही तीव्र व्यायाम किंवा अधिक प्रमाणात व्यायाम यांपैकी कोणतीही गोष्ट पुरेशी केली तर त्याचे तुमच्या शारीरीक क्षमतेनुसार कमी-अधिक फायदे तुम्हाला मिळतात असं जॉयनर यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - Investment: आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे जबरदस्त पर्याय, 251 टक्क्यांनी मिळाला परतावा

1964 च्या शर्यतीतल्या अॅथलीटचं (Athlete) प्रशिक्षण आधुनिक अॅथलीट्सनी निवडलेल्या प्रशिक्षणासारखं आहे. गिबाला-बिशप गटातल्या चर्चेमुळे व्यायामाचा व्हॉल्यूम आणि तीव्रता या दोन्ही बाबींचं समर्थन करणारे युक्तिवाद पुढे आले आहेत; मात्र तुम्ही काही आठवडे किंवा महिने चालणाऱ्या या अभ्यासापलीकडे जाऊन आपल्या आयुष्यभराच्या फिटनेसबाबत विचार करत असाल तर कोणत्याही पद्धतीने व्यायाम करण्याला प्राधान्य द्या, ते अधिक महत्त्वाचं ठरेल, असं अॅलेक्स हचिन्सन यांनी 'गेटपॉकेट डॉट कॉम'च्या लेखात म्हटलं आहे.

First published:

Tags: Health, Health Tips