नवी दिल्ली, 25 एप्रिल : उन्हाळ्यात अनेकजण बाहेरगावी, फिरायला जाण्याचे बेत आखतात. ज्यासाठी खरेदीपासून ते पॅकिंगपर्यंत प्रत्येक गरजेची अत्यंत बारकाईने काळजी घेतली जाते. पण, प्रवासाच्या या उत्साहात काही लोक प्रवासादरम्यान आपला डाएट प्लॅन (Diet Plan) करायला विसरतात. त्यामुळे प्रवासात तब्येत तर बिघडतेच; शिवाय प्रवासाची मजाही मिळत नाही. प्रवासाला (Travelling) जाण्यापूर्वी काही आवश्यक खाद्यपदार्थ सोबत ठेवल्यास, आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता तुम्ही प्रवासाचा पुरेपूर आनंद (Travel Tips) घेऊ शकता.
काही लोकांना प्रवासात सोबत अन्नपदार्थ घेणं आवडत नाही. मग प्रवासादरम्यान बाहेरील अन्नपदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. पण बाहेर मिळणारी प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असतेच असं नाही. तेव्हा काही अरबट-चरबट पदार्थ किंवा पुरेशी काळजी घेऊन स्वच्छतेत तयार न केलेले पदार्थ खाल्ल्यानं पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, उलट्या आणि लूज मोशनची समस्या होऊ शकते. हे टाळण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचं पालन करून आरोग्याची काळजी न करता प्रवासाचा आनंद घेता येईल.
हलके अन्न खा -
प्रवासादरम्यान हलके अन्न घेणं चांगलं. प्रवास लांबचा असेल तर जड आहाराच्या तुलनेत हलके अन्न सहज पचतं. प्रवासात उकडलेली अंडी, डाळी, भात किंवा खिचडी तयार करून घेऊ शकता. तसेच प्रवासात एनर्जी टिकवण्यासाठी काही फळे किंवा फळांचे ज्यूस सोबत ठेवायला विसरू नका.
असे पदार्थ सोबत घ्या -
प्रवासाला जाण्यापूर्वी काही तयार केलेल्या गोष्टी खाण्यासाठी ठेवा. यासाठी तुम्ही सँडविच बनवून ठेवू शकता. तसेच स्नॅक म्हणून फ्रूट सॅलड, फळे आणि ड्रायफ्रूट्स घेऊ शकता.
हे वाचा - दह्यामध्ये घरातीलच या गोष्टी मिसळून खा; अनेक आजारांवर फायदा होईल
तेलकट पदार्थ नको -
प्रवासात चिप्स, कुरकुरीत आणि तळलेले पदार्थ खायला अनेकांना आवडतं. तेलकट पदार्थ उन्हाळ्यात लवकर पचत नाहीत, आणि त्यामुळे पोटात दुखू शकते. यासोबतच तहानही खूप लागते. त्यामुळे प्रवासात या गोष्टींचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.
पाणी पुरेसं प्या -
प्रवासादरम्यान पुरेसं पाणी प्यायला हवं. शक्य असल्यास घरातून काही पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवा. तुम्हाला पाणी विकत घ्यायचे असेल तर प्रवास करताना फक्त सीलबंद पाण्याच्या बाटल्या घ्या. तसेच, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चव बदलण्यासाठी पॅकेजिंग ज्यूस देखील पिऊ शकता.
हे वाचा - फिट-निरोगी राहण्यासाठी जास्त पैसे देण्याची नाही गरज; हा घ्या लो बजेट हेल्दी डाएट
जेवणाची वेळ चुकवू नका -
प्रवासाच्या उत्साहात जेवणाची वेळ चुकवू नका. प्रवासात हलका आहार घेतला असेल तर दर दोन तासांनी काहीतरी खात राहा. जड आहार घेतल्यानंतर पाच ते सहा तास काहीही खाणे टाळा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Travel, Travelling