मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Curd Benefits: दह्यामध्ये घरातीलच या गोष्टी मिसळून खा; अनेक आजारांवर फायदा होईल

Curd Benefits: दह्यामध्ये घरातीलच या गोष्टी मिसळून खा; अनेक आजारांवर फायदा होईल

दही - 

दही हे एक प्रोबायोटिक अन्न आहे, जे आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मजबूत करण्यास मदत करते. हे पचनसंस्थेसाठीही चांगले असते. लहान मुलांना जेवणासोबत दही दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते.

दही - दही हे एक प्रोबायोटिक अन्न आहे, जे आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मजबूत करण्यास मदत करते. हे पचनसंस्थेसाठीही चांगले असते. लहान मुलांना जेवणासोबत दही दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते.

दही आपल्या हाडांसाठीही उपयुक्त आहे. दह्यातील कॅल्शियम आपले दात आणि नखांना मजबूत करतं. दही नियमित खाल्ल्यानं आपल्या मांसपेशी चांगल्या प्रकारे कार्यरत (Curd Benefits For Health) राहतात.

मुंबई, 23 एप्रिल : दही हे एक प्रोबायोटिक असल्यानं ते खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात दही नियमित खाल्ल्याने पोटात होणारी जळजळ थांबते आणि पोटाला थंडावा मिळतो. दही आपल्या हाडांसाठीही उपयुक्त आहे. दह्यातील कॅल्शियम आपले दात आणि नखांना मजबूत करतं. दह्याच्या नियमित सेवनानं आपल्या मांसपेशी चांगल्या प्रकारे कार्यरत (Curd Benefits For Health) राहतात. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, दह्यात काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार कमी होतात. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच यामध्ये लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस देखील असतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टी दह्यात मिसळल्यानं आपल्याला फायदा होतो.

1. दही आणि जिरे -

दही आणि जिरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. वजन वाढीच्या त्रासाने हैराण असाल तर दह्यासोबत जिरे खाऊ शकता, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. यासाठी तुम्ही जिरे भाजून घ्या. यानंतर ते दह्यात मिसळून खा.

2. दही-साखर -

दही आणि साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या दोन्हीं गोष्टी एकत्र घेतल्याने कफ होण्याचा त्रास कमी होतो. यासोबतच आपल्या शरीराला झटपट ऊर्जाही मिळते.

3. दही आणि सेंधव मीठ -

दही आणि सेंधव मीठ सहसा उपवासाच्या वेळी खाल्ले जाते. दही आणि सेंधव मीठ एकत्र खाल्ल्यानं अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

हे वाचा - लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय

4. दही आणि ओवा -

दही आणि ओवा एकत्र खाणं अनेक आजारांवर फायदेशीर आहे. दात दुखी असेल तर या दोन गोष्टी नक्की एकत्र खा. यामुळे तोंडातील अल्सरपासूनही आराम मिळेल.

हे वाचा - रणरणत्या वाळवंटातही वृद्धेला घेतलं पाठीवर; उपचारासाठी लेडी पोलिसाची धडपड

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips