जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शिट्टी नाही Moonwalk करून ट्रॅफिक कंट्रोल करणारा वाहतूक पोलीस; VIDEO VIRAL

शिट्टी नाही Moonwalk करून ट्रॅफिक कंट्रोल करणारा वाहतूक पोलीस; VIDEO VIRAL

शिट्टी नाही Moonwalk करून ट्रॅफिक कंट्रोल करणारा वाहतूक पोलीस; VIDEO VIRAL

अनोख्या पद्धतीनं ट्रॅफिक कंट्रोल (traffic control) करणाऱ्या या ट्रॅफिक पोलिसाचा (traffic police) व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदोर, 21  जानेवारी : मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदूरमधील (Indore) एका ट्रॅफिक पोलिसाच्या (traffic police) व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घातला आहे. या ट्रॅफिक पोलिसाचे सोशल मीडियावर (social media) लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या अनोख्या डान्स स्टाईलने ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याने या ट्रॅफिक पोलिसाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणजीत सिंह असं या ट्रॅफिक पोलिसाचं नाव असून तो मायकल जॅक्सनच्या  (Michael Jackson) स्टाईलमध्ये मूनवॉक (moonwalk) करत ट्रॅफिक कंट्रोल करत आहे. रणजीत सिंहच्या या अनोख्या स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. रणजितच्या डान्सद्वारे ट्रॅफिक कंट्रोल करण्यामागे एक मन हेलावून टाकणारी घटना आहे. ट्रॅफिक पोलिस रणजित सिंह ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी डान्स करत असल्याने ते इंदोर शहरामध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या 16 वर्षांपासून ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मायकल जॅक्सनच्या मूनवॉकचा  वापर करत आहे. रणजित यांच्या या काम करण्याच्या मजेशीर स्टाईलमुळे ते स्थानिक पातळीवर सेलिब्रिटी झाले असून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. हे वाचा -  डरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO एनडीटीव्ही शी बोलताना रणजित सिंह यांनी सांगितले की, ‘16 वर्षांपासून मी डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करत आहे. एका घटनेने मला बदललं. त्यादिवशी मला कम्युनिकेशन डिव्हाइसवरून एका ठिकाणी अपघात झाला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे जा असा आदेश आला. मी घटनास्थळी दाखल झालो तेव्हा मला कळाले की अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती माझा मित्र आहे. रागाच्या भरात रस्ता ओलांडून जात असताना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं तुझी हालचाल पाहून लोक थांबले आहेत. त्यानंतर मी आपल्या कामात डान्सचा वापर करण्यास सुरुवात केली. मूनवॉकच्या माध्यमातून मी ट्रॅफिक कंट्रोल करायला लागतो.’ रणजित सिंह यांनी पुढे सांगितले की, ‘मला सुरुवातीपासूनच डान्सची आवड होती पण गरिबीमुळे मला डान्सची आवड पूर्ण करता आली नाही. माझा डान्स प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास मदत करतो. तसंच प्रवासी वाईट मनस्थितीत असतात माझा डान्स पाहून त्यांना आनंद होतो’, असंदेखील त्यांनी सांगितलं. रणजित सिंह अनोख्या स्टाईलने ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याने वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यावर खूश आहेत. हे वाचा - कुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; पाहा VIRAL VIDEO वरिष्ठ अधिकारी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, ‘रणजित सिंह आपल्या कामात पारंगत आहे. ज्या चौकामध्ये ते कार्यरत आहेत त्याठिकाणी वाहनांची रहदारी चांगली असते. त्यांची ही स्टाईल आहे ज्याद्वारे ते नागरिकांना थांबवतात पण ते त्यांच्याशी भांडत नाहीत. या कामाबद्दल ट्रॅफिक पोलिस रणजीत सिंह यांना बेस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. ते ट्रॅफिक पोलिसांना चांगल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ट्रेनिंग सुद्धा देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात