मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात जिममध्ये जायचा कंटाळा येतो? फीट राहण्यासाठी घरीच करा हे सोपे काम

हिवाळ्यात जिममध्ये जायचा कंटाळा येतो? फीट राहण्यासाठी घरीच करा हे सोपे काम

हिवाळ्यात तुम्हालाही जीममध्ये जाण्याचा कंटाळा आला असेल तर काळजी करू नका तुम्ही घरी राहून देखील स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या सवयी लावून घ्याव्या लागतील.

हिवाळ्यात तुम्हालाही जीममध्ये जाण्याचा कंटाळा आला असेल तर काळजी करू नका तुम्ही घरी राहून देखील स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या सवयी लावून घ्याव्या लागतील.

हिवाळ्यात तुम्हालाही जीममध्ये जाण्याचा कंटाळा आला असेल तर काळजी करू नका तुम्ही घरी राहून देखील स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या सवयी लावून घ्याव्या लागतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 डिसेंबर : हिवाळ्या लोक शरीर फीट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारीरक कसरत करतात. काही लोक योगा करून शरीर लवचिक ठेवण्यासाठी प्रयत्न करतात तर काही जण व्यायाम करून शरीर मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु अनेक जण असेही असतात ज्यांना जिममध्ये जाऊन व्यायाम करणे हे सर्वात कठीण काम वाटते. अनेकांना हिवाळ्यात कुठेही बाहेर न पडता घरात बसून राहण्यास पसंती देतात. यामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे हिवाळ्यात प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्हाला जीममध्ये जायला आवडत नसेल तर तुम्ही घरीच काही अॅक्टिव्हिटी करून तुमचे शरीर फीट ठेऊ शकता. ते कसे हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात व्यायाम न केल्यास किंवा जिममध्ये न गेल्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात. रोज व्यायाम केला नाही तर तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. या शिवाय अनेक आजार तुम्हाला जडू शकतात. तुम्ही जीममध्ये जात नसाल आणि तुम्हाला या सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल तर काळजी करू नका. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत जे तुम्ही सहज करू शकता आणि तुमची फीगर आकर्षक बनवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला घरीच काही नियम बनवावे लागतील आणि त्याप्रमाणे वागावे लागेल.

Winter Health : कॅन्सरचा धोका दूर करण्यासाठी हिवाळ्यात खा डाळिंब, अभ्यासात झाले सिद्ध

या सोप्या सवयी तुम्हाला ठेवतील तंदुरुस्त

सायकलिंक करा : बाजारात किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी नेहमी सायकलचा वापर करा. सायकलिंगमुळे शरीरात ऊर्जा तयार होते आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीही खूप मदत होते. तुम्ही दिवसातून दोनदा सायकलिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

घरीच स्ट्रेचिंग करा : तुम्हाला जीममध्ये जायला आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्ट्रेचिंग किंवा सोपे व्यायाम करू शकता. घरच्या घरी सहज व्यायाम केल्याने तुमचे शरीर सक्रिय राहते आणि रक्ताभिसरणही चांगले होते. यामुळे तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

साफ-सफाई करत राहा : घरात राहूनही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. तुम्हाला फक्त कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहावे लागेल. जसे घर आणि खोली स्वतः स्वच्छ करणे. अशा प्रकारचे कामं करून तुम्ही तुमचे शरीर दिवसभर सक्रिय ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.

मोकळ्या हवेत फिरा : तुम्हाला घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असेल तर त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. जेणेकरुन तुम्हालाही काही वेळ मोकळ्या हवेत फिरता येईल. नियमित सकाळ-संध्याकाळ थोडावेळ चालण्याचा प्रयत्न करा. कारण चालण्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.

पाणी पित राहा : हिवाळ्यात फारशी तहाण लागत नाही. परंतु असे असेल तरी सतत पाणी पिण्याची सवय लावा. कारण हिवाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

हिवाळ्यात बद्धकोष्टतेसोबत अनेक त्रास होतील दूर, फक्त रोज यावेळी खा बडीशेप

शरीर सक्रिय ठेवा : तुम्ही घरीच राहत असाल तर जास्त वेळ पलंगावर पडून राहू नका. स्वत:ला सतत कोणत्या न कोणत्या कामात व्यस्थ ठेवा. यामुळे तुम्ही लठ्ठपणाची समस्या दूर ठेवू शकता. दिवसभर स्वत:ला व्यस्त ठेवाल जेवढे सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत होईल.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Types of exercise, Winter