मुंबई, 26 डिसेंबर : डाळिंब हे आरोग्यासाठी अतिशय उपयोगी फळ आहे. डॉक्टर सर्व प्रकारच्या आजारांमध्ये डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंबात कॅन्सर दूर ठेवण्याची क्षमता असते हे संशोधनात सिद्ध झाले आहे. एवढेच नाही तर दररोज एक डाळिंब खाल्ल्यास तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याचीही गरज भासणार नाही असे सांगितले जाते. हिवाळ्यात तर डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. डाळिंब खाल्ल्याने रक्तदाब, पचनक्रिया आणि स्मरणशक्ती सुधारते. रक्तातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आणि अॅनिमियासारख्या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंब अतिशय उपयुक्त असते. हिवाळ्यात डाळिंब खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. डाळिंब खाल्याने त्वचा देखील ताजीतवाणी होते. एवढंच नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील डाळिंब मदत करते. जिममध्ये घाम गाळणाऱ्यांसाठी डाळिंब एक प्रभावी रिफ्रेशिंग फळ आहे. डाळिंबात असलेले तत्व शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असलेल्यांसाठी डाळिंब हे सर्वोत्तम फळ मानले जाते. डाळिंब खाल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करते. डाळिंबात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. याशिवाय अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले डाळिंब अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करते.
हिवाळ्यात बद्धकोष्टतेसोबत अनेक त्रास होतील दूर, फक्त रोज यावेळी खा बडीशेपकर्करोगाविरोधात लढणारे गुणधर्म डाळिंब अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार डाळिंबात कर्करोगाशी लढणारे आणि कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आहेत. या अभ्यासात म्हटले आहे की आपण अनेक शतकांपासून डाळिंबाचा वापर रोगांच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी करत आहोत. डाळिंब शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स, अँटी-प्रोलिफेरेटिव्ह आणि अँटी-ट्यूमोरिजेनिक गुणधर्मांनी समृद्ध आहे.
डाळिंबाचा रस, डाळिंबाची पावडर किंवा डाळिंबाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी, प्रजनन-विरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. यासोबतच डाळिंबात केमोप्रीव्हेंटिव्ह आणि केमोथेरप्युटिक एजंटचे गुणधर्म आहेत. हे क्लिनिकल अभ्यासात सिद्ध झाले आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की डाळिंबात असलेले कंपाउंड त्वचेचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि आतड्याचा कर्करोगाचे ट्यूमर संपवण्याचे काम तर करतेच शिवाय या कर्करोगांपासून बचाव देखील करू शकते. स्मरणशक्ती वाढवणारे गुणधर्म हेल्थलाइनच्या बातमीनुसार डाळिंबात एलाजिटानिस कंपाऊंड आढळते आणि ते एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीरातील सूज कमी होते. यासोबतच हे मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी होते. यामुळे बुद्धी फ्रेश आणि स्मरणशक्ती मजबूत होते. काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की डाळिंब मेंदूतील अल्झायमर आणि पार्किन्सन रोगापासून संरक्षण करते. एलिजिटानिस कंपाऊंड मेंदूच्या दुखापतीनंतर हायपोक्सिक इस्केमिकपासून लवकर आराम देते. एका अभ्यासानुसार इलेजिटानिस कंपाऊंड आतड्यात युरोलिथिन ए मध्ये रूपांतरित होते, त्यामुळे मेंदूतील सूज कमी होते आणि बौद्धिक क्षमता कमी होण्याचा धोका दूर होतो. Stale Food Side Effect : शिळे अन्न आपल्याला खरंच आळशी बनवते का? वाचा सत्य डाळिंब खाण्याचे इतर फायदे या सर्वांशिवाय डाळिंब शरीरातील चरबी नियंत्रित करते आणि चरबी वाढण्यापासून रोखते. डाळिंबात भरपूर फायबर देखील आढळतात त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय डाळिंब फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून शरीराचे रक्षण करते. फ्री रॅडिकल्समुळे त्वचा अकालीच कोमेजू लागते. म्हणजेच डाळिंब त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे अतिसार आणि कॉलरा अशा पोटाच्या समस्यांपासून बचाव करते. डाळिंब खाल्ल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. याशिवा डाळिंबात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडात प्लेक तयार होऊ देत नाही. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)