मुंबई, 10 जुलै : आपल्या जोडीदाराला महागड्या भेटवस्तू देऊन किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या ठिकाणी जाऊन एकत्र एन्जॉय केल्यानेच आनंद मिळतो. अनेकदा जोडपी याच गैरसमजात राहतात. मात्र प्रत्येक वेळी असे होत नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी (Spend Quality Time With Partner) चांगला वेळ काढला आणि काही वेळ एकत्र घालवला तर ते तुमच्या नात्यात प्रेम वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही वीकेंडला (Weekend Plan) तुमच्या जोडीदारासोबत सुट्टी खास बनवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुट्टी खास बनवू शकता. एकत्र स्वयंपाक करा तुम्हा दोघांनाही सुट्टीचा दिवस घरी एकत्र घालवायचा असेल तर बाहेरून जेवण मागवण्यापेक्षा एकत्र जेवणाचे नियोजन (Cook Together) करून स्वयंपाक बनवा. असे केल्याने तुम्ही खूप चांगला वेळ एकत्र घालवू शकाल आणि एकमेकांसोबत आनंद घेऊ शकाल.
Pranayama Benefits : प्राणायाम केल्याने वाढते आयुष्य, ‘हे’ आहेत काही प्रकार आणि प्राणायाम करण्याची योग्य पद्धतघरी डान्स नाईटची व्यवस्था करा पावसाळ्यात जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरीच डान्स प्लॅन (Plan A Dance Night At Home) केला आणि एखाद्या प्रायव्हेट पार्टीप्रमाणे तयारी केली तर तुमची सुट्टी खरोखरच खास असेल. एकत्र तुम्ही बॉलडान्स (Ball Dance) शिकू शकता आणि YouTube वर व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप सराव करू शकता. एकत्र खेळ खेळा सुट्टीच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत इनडोअर किंवा आउटडोअर गेमची योजना (Play Games Together) करा आणि कुठेतरी खेळायला जा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरातही एकत्र इनडोअर गेम्स खेळू शकता. Monsoon : पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेताना अशी घ्या आहाराची काळजी, अनेक आजार राहतील दूर मस्त गप्पाटप्पा मारा आपण संपूर्ण आठवडा ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे वीकेंडला चहाच्या कपासोबत गप्पागोष्टीचा आनंद (Chitchat With Partner) लुटू शकता. लक्षात ठेवा की कधीकधी श्रोता असणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तुमचा दृष्टिकोन सांगण्याव्यतिरिक्त तुमच्या पार्टनरचे लक्षपूर्वक ऐका आणि आनंद घ्या.