मुंबई, 19 जून : पावसाळा (Monsoon) आणि पावसात मस्ती करणं कोणाला नाही आवडत. आपण आतुरतेने पावसाळ्याची (Rainy Season) वाट पाहत असतो. पावसाळयातील मजा मस्तीव्यतिरिक्त पाऊस आपल्यासोबत काही आजारांनाही (Monsoon Health Issues) घेऊन येतो. यामुळे पावसाळ्यात आपण काय खातो, कसे खातो आणि कधी खातो यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचे कारण असे की हवामानातील बदलांमुळे आपल्या अन्नाला विविध जीवाणू (Bacteria) आणि विविध प्रकारचे विषाणू (Virus) सहजपणे संक्रमित करतात. शिवाय जेव्हा आपण असे संक्रमित अन्न नकळत खातो तेव्हा आपल्या एकूण आतड्याचे आरोग्य (Intestinal Health) आणि प्रतिकारशक्तीवर (Immunity) सहज परिणाम होतो. पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप (Seasonal Flu And Fever) व्यतिरिक्त पाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांचा धोका वाढत असतो. त्यामुळे आधीच सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. तुम्हला पावसाचा निखळ आनंद घेता यावा यासाठी आम्ही या पावसाळ्यात तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही काय खावे (Monsoon Healthy Food) आणि काय खाणे टाळावे याची माहिती आहे.
Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचासीफूड मर्यादित खा तुम्ही पेस्केटेरियन असाल किंवा सीफूडचे चाहते असाल. तर पावसाळा तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो. कारण या पावसाळ्यात तुम्ही सीफूड खाणे टाळले पाहिजे (Limit Seafood). पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचा धोका जास्त असतो. ज्यामुळे मासे आणि इतर जलचरांना संसर्गाचा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही सीफूड खाल्यास तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात सीफूड खाणे टाळणे चांगले. न शिजवलेले अन्न खाणे टाळा कच्च्या अन्नामध्ये हानिकारक जीवाणू आणि विषाणू असू शकतात आणि म्हणून न शिजवलेले किंवा अर्धवट शिजवलेले जेवण टाळले पाहिजे (Avoid Eating Uncooked Food). मांस शिजवताना तापमानावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पावसाळ्यात त्या अन्नावर बॅक्टेरिया आणि विषाणू टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. स्ट्रीट फूड खाणे पावसाळ्यातील तापमान बुरशीजन्य आणि जिवाणूंच्या वाढीसाठी आदर्श असते. पावसाळ्यात अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची शक्यतादेखील खूप जास्त असते. त्यामुळे वर्षाच्या या काळात तुम्ही स्ट्रीट फूडपासून दूर राहावे (Avoid Eating Street Food) किंवा बाहेरचे खाणे टाळावे.
Yoga Boosts Fertility: योगामुळे पुरुष-स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारते; हे प्रकार नियमित करून बघा परिणाम योगामुळे पुरुष-स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारते; हे प्रकार नियमित करून बघा परिणामकोणतेही फळ किंवा भाजी धुवूनच खावी तुम्ही तुमचे अन्न वर्षाच्या प्रत्येक काळात धुवून खाणे योग्य असते (Wash Before Consuming). पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशी बहुतेकदा भाज्या आणि फळांमध्ये, विशेषतः हिरव्या पालेभाज्यांमध्ये राहतात. आपले अन्न खाण्यापूर्वी ते योग्यरित्या धुणे अत्यंत महत्वाचे आहे. फळे आणि भाज्या खरेदी करताना काळजी घ्या. जर तुम्हाला यावर कापल्याचे किंवा चिरल्याचे काही चिन्ह दिसले तर असे फळ किंवा भाजी घेणे टाळा. पावसाळ्यात मांस शिजवण्यापूर्वी तुम्ही ते कोमट पाण्याने काळजीपूर्वक धुवावे.