मुंबई, 9 जुलै : योगा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. योगामध्ये (Yoga Benefits) वेगवेगळी आसने आहेत, ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. ही सर्व आसने आपल्याला उर्जा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यापैकी एक आसन म्हणजे प्राणायाम. प्राणायाम हे अत्यंत सोपे पण अतिशय फायद्याचे आसन आहे. प्राणायाम (Pranayama Benefits) केल्याने श्वासोच्छवासाच्या नियंत्रणाद्वारे जीवन ऊर्जा वाढते, श्वासोच्छवासाचे नियमन करून स्वतःला मजबूत आणि निरोगी ठेवता येते. आपले जीवन निरोगी आणि नियमित ठेवायचे असेल (Healthy And Long Life) आणि या जीवनाचा अखंड आनंद घ्यायचा असेल तर प्राणायाम करायला हवा. प्राणायाम आपल्या सभोवताली सकारात्मक ऊर्जेचे (Positive Energy) वर्तुळ निर्माण करतो. प्राणायाम हा जीवनाचा नियमित भाग बनवला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला प्राणायामाची सविस्तर माहिती देणार आहोत. प्राणायाम कसे करावे? हेल्थलाइननुसार, तुम्ही कुठेही बसून प्राणायाम करू शकता, ती जागा मोकळी आणि हवेशीर असेल तर अधिक चांगले. प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वात योग्य मानली जाते. हे आसन आपण संध्याकाळी मावळतीच्या सूर्यासोबतही करू शकतो. प्राणायाम करण्यासाठी पद्मासनात बसून डोळे बंद करावे लागतात. लक्षात ठेवा संपूर्ण आसन करताना तुमचा पाठीचा कणा सरळ असावा. श्वासाकडे आपले लक्ष केंद्रित करावे. श्वासावर लक्ष केंद्रित करून, नाकातून हळू हळू लांब आणि खोल श्वास घ्या. यानंतर श्वास हळूहळू सोडावा लागतो. पुढची पायरी म्हणजे तोंडातून हळू श्वास घेणे आणि “हम्म” किंवा ‘ओम’ म्हणत श्वास सोडणे. प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्वाचे आहे.
Monsoon : पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेताना अशी घ्या आहाराची काळजी, अनेक आजार राहतील दूरप्राणायामाचे प्रकार (Types Of Pranayama) सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही हा व्यायाम 5 ते 8 मिनिटे करू शकता आणि हळूहळू हा वेळ वाढवू शकता. सरासरी दहा ते पंधरा मिनिटे असे केल्याने तुमची दिनचर्या उत्तम राहाते आणि तुमची जीवन ऊर्जा देखील वाढते. लक्षात ठेवा की प्राणायामाचा रोजचा सराव रिकाम्या पोटी करावा. जर तुम्ही काही खाल्ले असेल तर हे आसन 4 तासांनंतरच करावे. तुम्ही जिथे आसने करत आहात तिथे आवाज नसावा, ती जागा स्वच्छ असावी आणि तिथे मोकळी हवा येत असावी. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, भ्रामरी प्राणायाम, कपालभाती, उज्जय, पर्यायी नाकपुडी श्वास हे त्याचे काही प्रमुख प्रकार आहेत. या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकवले जाते. Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचा प्राणायामाचे फायदे प्राणायामामुळे तुमची जीवनशक्ती वाढते. याशिवाय प्राणायाम केल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, प्राणायामामुळे धुम्रपान करण्याची इच्छाही कमी होते. तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि फुफ्फुसांना शक्ती प्रदान होते. प्राणायाम करताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे (Tips For Pranayama), जसे की जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर श्वासोच्छवासातील चढउतारांची काळजी घ्या, गर्भावस्थेतील महिलांनी हे आसन करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा किंवा योगगुरूंचा सल्ला नक्की घ्यावा.