मुंबई, 17 जून : आपण सर्वचजण पावसाची ( Monsoon) आतुरतेने वाट पाहतो. पावसाळा आल्यावर जसा आपल्याला आनंद होतो, त्याचप्रमाणे पावसासोबत काही समस्याही येतात. खासकरून वाहनचालकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: अनोळखी रस्त्यावर पाणी तुंबलं असेल तर त्या ठिकाणी खड्डा तर नाही ना, ही भीती प्रत्येक वाहनचालकाच्या मनात असते. याशिवाय सर्वत्र पाणी साचल्यामुळे चिखल होतो आणि त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनेही घसरायला लागतात. पावसाळ्यात टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. रस्त्यांची गिट्टी खचल्यामुळे वाहनांच्या टायरचं मोठं नुकसान होते. मात्र काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास वाहन पंक्चर होण्यापासून वाचू शकते. आज आपण अशाच काही टिप्स (Rainy Season Safety Tips) जाणून घेणार आहोत.
1.रस्त्यांची स्थिती
पावसात बहुतांश रस्ते खराब होतात. रस्त्याच्या गिट्टीवर टायरची पकड कमकुवत होते. अशा स्थितीत जेव्हा गाडीचा वेग जास्त असताना ब्रेक लावला जातो तेव्हा ती घसरण्याची शक्यता असते. असे अपघात अनेकदा होतात. खासकरून शेताला लागून असलेल्या रस्त्यांवर चिखल झाल्याने घसरण्याची शक्यताही वाढते. वळणांवर वाळू किंवा खडी टाकल्याने रस्ता निसरडा होतो. अशा प्रकारच्या रस्त्यांवर वाहने जपून चालवा.
हेही वाचा- बजाजची लोकप्रिय बाईक Pulsar नव्या रूपात होणार लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
2. वाहनाच्या टायरची स्थिती
कोणत्याही वाहनाचे टायर जास्त खराब असू नयेत. टायर्समध्ये 3mm थ्रेड असणे आवश्यक आहे, कारण त्यांची रस्त्यावर चांगली पकड असते. टायरमधील हवेचा दाब बरोबर नसेल तर टायर पंक्चर होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर कार घसरण्याची शक्यताही वाढते, त्यामुळे टायरमधील हवेचा दाब अगदी योग्य असावा. टायर्समधली हवा कंपनी सांगेल तितकीच असावी हेही लक्षात असावं.
हेही वाचा- Car Loan: नवीन कार घ्यायचीये? मग प्रमुख बॅंकांचे कार लोनसाठीचे ताजे व्याजदर जाणून घ्या एका क्लिकवर
3. वाहन चालवण्याची योग्य पद्धत
पावसाळ्यात रस्त्यावर गाडीचा वेगही खूप महत्त्वाचा असतो. महामार्गावर वेग 80 kmph पेक्षा जास्त नसावा. जेव्हा वाहनाचा वेग कमी असतो तेव्हा वाहन पूर्ण नियंत्रणात राहते आणि घसरण्याचा धोकाही टाळतो. अशा परिस्थितीत, निसरड्या पृष्ठभागावर अचानक स्टीयरिंग फिरवू नका. अचानक एक्सीलरेटर वाढवू नका. हळू हळू ब्रेक लावा. जेणेकरुन ब्रेक लावल्यावर गाडी रेषेच्या बाहेर जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Safety, Tyre burst, Vehicles