Home /News /money /

Car Loan: नवीन कार घ्यायचीये? मग प्रमुख बॅंकांचे कार लोनसाठीचे ताजे व्याजदर जाणून घ्या एका क्लिकवर

Car Loan: नवीन कार घ्यायचीये? मग प्रमुख बॅंकांचे कार लोनसाठीचे ताजे व्याजदर जाणून घ्या एका क्लिकवर

कार लोनसाठी ताजे व्याजदर

कार लोनसाठी ताजे व्याजदर

5 वर्षं कालावधीसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोनसाठीचे व्याजदर आणि ईएमआय (परतफेडीचा मासिक हप्ता) यांबद्दलची ताजी माहिती

  मुंबई, 25 मे: आपल्याकडे कार (Car) असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकजण काटेकोर आर्थिक नियोजन (Financial Planning) करत असतो. काही जण कार खरेदीसाठी लोन अर्थात कर्जाचा पर्याय वापरतात. देशातल्या प्रमुख सरकारी बॅंकासह, सहकारी आणि खासगी बॅंका, तसंच वित्तसंस्था कार लोन (Car Loan) सुविधा उपलब्ध करून देतात. सध्याची एकूण आर्थिक स्थिती पाहता होम लोन, कार लोनच्या व्याजदरात (Interest Rate) कमी-जास्त प्रमाणात बदल होत आहेत. 5 वर्षांच्या कालावधीकरिता 10 लाख रुपयांच्या कार लोनसाठीचे वार्षिक व्याजदर आणि ईएमआय यांची माहिती अलीकडेच प्रमुख बॅंकांच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे. `बॅंकबाजार डॉट कॉम`ने त्या सर्व बँकांच्या माहितीचं 24 मे 2022 रोजी संकलन करून प्रसिद्ध केलं आहे. त्यातल्या माहितीनुसार, 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोनकरिता पीएनबी बॅंकेचा (PNB Bank) वार्षिक व्याजदर सर्वांत कमी म्हणजेच 7.15 टक्के असून, ग्राहकाला 19,872 रुपये ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे 5 वर्षं कालावधीसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोनसाठी साउथ इंडियन बॅंकेचा (South Indian Bank) व्याजदर सर्वाधिक म्हणजेच 9.15 टक्के असून, ग्राहकाला 20,831 रुपये ईएमआय द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे या कार लोन प्रक्रियेमधून ई-व्हेईकल्सना (E-vehicles) वगळण्यात आलं आहे. 5 वर्षं कालावधीसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोनसाठीचे व्याजदर आणि ईएमआय (परतफेडीचा मासिक हप्ता) यांबद्दलची ताजी माहिती 24 मे 2022 रोजी बँकबाजार डॉट कॉमने संकलित केली आहे. हे व्याजदर सूचक स्वरूपाचे असून, संबंधित बॅंकेच्या नियमांनुसार आणि ग्राहकांच्या स्थितीनुसार त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकाला 5 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांचे कार लोन घ्यायचे असेल तर पीएनबी बॅंकेचा व्याज दर 7.15 टक्के असून, ग्राहकाला त्यानुसार 19,872 रुपये ईएमआय द्यावा लागणार आहे. पंजाब अँड सिंध बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचा व्याजदर 7.20 टक्के असून, ग्राहकांना 19,896 रुपये ईएमआय द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे, बीओआय (BOI) आणि सेंट्रल बॅंकेचा व्याजदर 7.25 टक्के असून, त्यानुसार ग्राहकांना 19,919 रुपये ईएमआय द्यावा लागेल. हाच कालावधी आणि ह्याच रकमेच्या कार लोनकरिता इंडियन बॅंक आणि युनियन बॅंकेचा व्याजदर 7.30 टक्के असून, ग्राहकाला 19,943 रुपये ईएमआय भरावा लागेल. 50 रुपये जमा करुन मिळतील 35 लाख, Post Office च्या या योजनेबाबत जाणून घ्या
  हाच कालावधी आणि ह्याच रकमेच्या लोनसाठी आयडीबीआय बॅंकेचा (IDBI Bank) व्याजदर 7.35 टक्के आहे. यानुसार, ग्राहकाला 19,967 रुपये ईएमआय भरावा लागेल. बॅंक ऑफ बडोदा आणि एसबीआयचा (SBI) व्याजदर 7.40 टक्के असून, 19,990 रुपये ईएमआय ग्राहकांना द्यावा लागेल.
  5 वर्षं कालावधीसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोन करता अ‍ॅक्सिस बॅंकेचा व्याज दर 7.45 टक्के असून, त्यानुसार 20,014 रुपये ईएमआय ग्राहकांना द्यावा लागेल. आयसीआयसीआय बॅंकेचा (ICICI Bank) कार लोनसाठीचा व्याजदर 7.50 टक्के आहे. ग्राहकांना यानुसार 20,038 रुपये ईएमआय पडेल. कॅनरा बॅंकेचा व्याजदर 7.70 टक्के असून, 20,133 रुपये ईएमआय ग्राहकांना यानुसार भरावा लागेल. हाच कालावधी आणि याच रकमेकरिता करुर वैश्य बॅंकेचा कार लोनसाठीचा व्याजदर 7.80 टक्के असून, ग्राहकांना 20,181 रुपये ईएमआय द्यावा लागेल. आयओबीचा (IOB) कार लोनसाठी 7.95 टक्के व्याजदर असून, त्यानुसार ग्राहकांना 20,252 रुपये ईएमआय द्यावा लागेल. Petrol Diesel Prices: इंधन दरात घसरण, तपासा आजचा पेट्रोल-डिझेल भाव देशातल्या प्रमुख बॅंकापैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने 5 वर्षं कालावधीसाठी 10 लाख रुपयांच्या कार लोनकरिता 7.95 टक्के व्याजदर घोषित केला असून, त्यानुसार ग्राहकाला 20,252 रुपये ईएमआय द्यावा लागेल. कर्नाटक बॅंकेचा व्याजदर 8.05 टक्के असून, 20,300 ईएमआय ग्राहकाला द्यावा लागेल. युको बॅंक, जे अँड के बॅंक (J&K Bank) आणि धनलक्ष्मी बॅंकेचा व्याजदर 8.10 टक्के असून, ग्राहकाला त्यानुसार 20,324 रुपये ईएमआय द्यावा लागेल. फेडरल बॅंकेचा याच कार लोनसाठी 8.90 टक्के व्याजदर असून, त्यानुसार 20,710 रुपये ईएमआय ग्राहकाला द्यावा लागेल. साउथ इंडियन बॅंकेचा कार लोनसाठीचा व्याजदर सर्वाधिक म्हणजेच 9.15 टक्के असून, त्यानुसार ग्राहकाला ईएमआयपोटी (Equated Monthly Installments) सर्वाधिक म्हणजेच 20,831 रुपये इतकी रक्कम अदा करावी लागेल.
  First published:

  Tags: Instant loans, Loan, Money

  पुढील बातम्या