मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

क्रशला पटवायला फार मेहनतीची गरज नाही; पटापट इम्प्रेस करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला सोपा फंडा

क्रशला पटवायला फार मेहनतीची गरज नाही; पटापट इम्प्रेस करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला सोपा फंडा

पत्नीशी बोलून तिच्या नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा.

पत्नीशी बोलून तिच्या नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा.

कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सोप्या टीप्स.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 जुलै: आपल्याला जी व्यक्ती आवडते, जिच्यावर आपण प्रेम (Love) करतो, त्या व्यक्तीने आपल्यावरही प्रेम करावं, असं आपल्याला वाटतं. बहुतेक वेळा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम करत असते. मग अशावेळी त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, पटवण्यासाठी किती तरी पापड बेलावे लागतात. पण आता तुमच्या क्रशला (Crush) पटवण्यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही. तज्ज्ञाने यासाठी एक सोपा फंडा दिला (Love tips) आहे.

लाइफ कोच फ्रांसिस्काने (Life Coach Francesca) कुणालाही इम्प्रेस (Tips to Impress) कसं करावं, आपल्याकडे आकर्षित कसं करावं याचा टिकटॉकवर एक व्हिडीओ बनवला आहे. या टीप्स फॉलो केल्याने खूप फायदेशीर ठरतील असा दावाही तिने केला आहे.

फ्रान्सिकाने सांगितलं, तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्या हावभावाची नकल करा. ती तुमच्यासोबत बोलत असेल तर तिला उत्तर देताना काही सेकंद थांबा. कुणाच्या मनात तुमच्याबाबत रूची निर्माण करण्याचा हा अचूक उपाय आहे. कुणाची तरी आपण आवड बनवण्याचा हे काही स्निकी सायकोलॉजिकल ट्रिक्स (Sneaky psychological tricks) आहेत.

बेन्जामिन फ्रँकलिन इफेक्टने इम्प्रेस करा

तुम्हाला जी व्यक्ती आवडते तिच्याकडून काही फेव्हर मांगा. ज्यामुळे जर ती तुमची मदत करेल तर कदाचित ती तुमची प्रशंसक आहे, असं तिला वाटू लागेल. याला फ्रान्सिकाने बेन्जामिन फ्रँकलिन इफेक्ट (Benjamin Franklin Effect)  म्हटलं आहे. उदा. 'त्या व्यक्तीला विचारा, कृपया तू मला ते मीठ देऊ शकतो का किंवा शकते का?'. असं केल्यानं त्या व्यक्तीला वाटेल की तिला तुम्ही आवडता कारण ती तुमची मदत करत आहे.

हे वाचा - ब्रेकअप के बाद गर्लफ्रेंडचा 'कार'नामा; धोखेबाज बॉयफ्रेंडचा घेतला सॉलिड बदला

नावाने हाक मारा

तुम्हाला जी व्यक्ती आवडते, तिला तिच्या नावाने हाक मारा. आपलं नाव आपल्याला दुसऱ्या कुणाकडून तरी ऐकणं बरं वाटतं, आपण त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे, असं वाटू लागतं. त्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी काही सेकंद थांबा, प्रतीक्षा करा मग उत्तर द्या. यामुळे त्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही तिला जे काही सांगणार आहात, त्याचा नीट विचार करत आहात. तुम्ही एक उत्तम श्रोते आहात, असं तिला वाटेल.

हे वाचा - एकटी नारी तरुणांवर पडली भारी! छेड काढताच घडवली अशी अद्दल; कुणीच करणार नाही नाद

आवडत्या व्यक्तीच्या हावभावाची नकल करा

संबंधित व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजची नकल करा. यामुळे त्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही अगदी त्यांच्याप्रमाणेच आहात आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. शिवाय कुणालाही आपलं कौतुक केलंलं आवडतं. त्यामुळे त्या व्यक्तीमधील एक खास बाब ओळखून तिचं कौतुक करा. यामुळे ती व्यक्ती इम्प्रेस होईल.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Love, Love at first sight