Home /News /lifestyle /

एकटी नारी 3 तरुणांवर पडली भारी! छेड काढताच असा शिकवला धडा; VIDEO पाहून कुणीही करणार नाही नाद

एकटी नारी 3 तरुणांवर पडली भारी! छेड काढताच असा शिकवला धडा; VIDEO पाहून कुणीही करणार नाही नाद

यापुढे हे तरुण कोणत्याच तरुणीची छेड काढणार नाहीत.

    मुंबई, 12 जुलै : रस्त्याने छेड काढणाऱ्या तरुणांची कमी नाही. अनेक तरुणी भीतीपोटी त्यांना प्रत्युत्तर देत नाही. पण तरुणांनो आता सावध राहा! आता तरुणीसुद्धा कमी नाहीत. तुमच्या छेडछाडीला उत्तर देण्यास त्यासुद्धा चांगल्याच समर्थ आहेत. सध्या असाच एका डेअरिंगबाज तरुणीचा (Brave girl) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. जी एकटी असून तीन-तीन तरुणांवर भारी पडली (Boy molest girl). भर रस्त्यात दिवसाढवळ्या छेड काढणाऱ्या तरुणांना तरुणींनी चांगलीच अद्दल (Girl fight with boy) घडवली आहे. तिने या तरुणांना असा कायमचा धडा शिकवला आहे की यापुढे हे तरुण कोणत्याच तरुणीची छेड काढणार नाहीत. व्हिडीओत पाहू शकता ही तरुणी सायकलवरून जात आहे. पुढे एक कार उभी आहे. जेव्हा ही तरुणी सायकलवरून त्या कारजवळ पोहोचते तेव्हा गाडीतील एक तरुण तिच्या मागील भागावर मारतो. तरुणी इतकी भडकते ती सायकलवरून उतरते आणि आपली सायकल थेट त्या गाडीवर फेकून मारते आणि ती तरुणांवर संतप्त होते. त्यानंतर ज्या तरुणाने तिची छेड काढली तो तरुण लगेच गाडीतून बाहेर पडतो. तरुणीने सायकल आपल्या गाडीवर आदळल्याने तो शॉक होतो. तो तरुणीशी भांडतो. हे वाचा - आकाशातच विमानाचा दरवाजा उघडायला गेली आणि पुढे असं काही घडलं की...; पाहा VIDEO तरुण बाहेर येताच तरुणी आपला एक पाय उचलते आणि त्याच्या गुप्तांगावरच धाडकन मारते. तरुणाला नको त्या जागी मार बसल्याने तो चांगलाच कळवळतो. त्यानंतर गाडीच्या आत असलेला दुसरा तरुण तिच्याशी भांडू लागतो तेव्हा ती त्यालासुद्धा एक पंच मारते, तो तरुणसुद्धा गार होतो. नंतर दुसऱ्या बाजूने गाडीबाहेर असलेला एक तरुण येतो, त्यालासुद्धा ती एकाच फटक्यात तिथून पळवून लावते. पुन्हा आधीच्या तरुणाकडे येऊन त्याला परत मारते. हे वाचा - पाय घसरून पडल्यानं गर्भवतीनं गमावलं बाळ; मिळाली 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हि़डीओ शेअर केला आहे. जेव्हा चुकीचा पंगा घेतला असेल तेव्हा.. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तरुणीच्या हिमतीला सर्व जण दाद देत आहेत. तिचं कौतुक करत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Woman

    पुढील बातम्या