Home /News /lifestyle /

Wooden Ashes: लाकूड जाळून राहिलेली राख फेकू नका, त्याचा या कामांसाठी होतो चांगला वापर

Wooden Ashes: लाकूड जाळून राहिलेली राख फेकू नका, त्याचा या कामांसाठी होतो चांगला वापर

लाकूड जितकं फायदेशीर आहे तितकीच त्याची राख देखील फायदेशीर आहे. जाळल्यानंतर, लाकडाच्या राखेमध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात, जे तुमच्या बागेसाठी किंवा शेतीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

    मुंबई, 13 मे : बर्‍याचदा आपण अनेक गोष्टी निरुपयोगी म्हणून फेकून देतो, पण त्या गोष्टींचा पुन्हा कसा वापर करायचा हे समजल्यास त्या खूप उपयोगी पडू शकतात. आपल्या घरात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला लाकूड जाळावे लागते. ग्रामीण भाग किंवा छोट्या शहरांमध्येसुद्धा चुलीचा वापर होत असल्याने राख उरते, बऱ्याचदा पडलेली राख अशी सोडण्याऐवजी किंवा फेकण्याऐवजी तुम्ही ती तुमच्या बागेत वापरू शकता. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की लाकूड जितकं फायदेशीर आहे तितकीच त्याची राख देखील फायदेशीर आहे. जाळल्यानंतर, लाकडाच्या राखेमध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात, जे तुमच्या बागेसाठी किंवा शेतीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊया, जळालेल्या लाकडाची राखेचा कसा (Reuses Of Wooden Ashes) वापर करायचा. बागेत लाकडाची राख पसरवा - बागेत लाकडाची राख पसरवणे हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे. पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, जास्त प्रमाणात लाकडाची राख आपण वाफ्यांमध्ये पसरू शकत नाही. कारण ते मातीचा पीएच वाढवते. हिवाळ्यात थोडी जास्त राख वापरता येत असली तरी इतर ऋतूंमध्ये तसं करता येत नाही. कंपोस्ट सुधारणे - राखेमध्ये असलेल्या फायदेशीर घटकामुळे, खत तयार करण्यासाठी त्याचा चांगला वापर होतो. त्यातील फायदेशीर घटक कंपोस्ट सुधारण्यास मदत करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की राखेमध्ये मातीचा पीएच बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे ती कमी वापरली पाहिजे. जेव्हा तुम्ही खत घालता तेव्हा प्रत्येक 6 इंच थरावर थोडी राख शिंपडा. जर तुम्ही फळांच्या साली किंवा घरातील इतर आम्लयुक्त कचऱ्यापासून कंपोस्ट बनवत असाल तर तुम्ही जास्त राख वापरू शकता. हे वाचा - रोजच्या या चुकीच्या सवयीमुळे अनेकांची सेक्शुअल लाइफ होतेय खराब; वेळीच Alert व्हा कीटक येणार नाहीत - बागेच्या ज्या भागात गोगलगाय आणि इतर किटक वैगेर येतात, त्या भागात राखेचा पातळ थर पसरवा. त्यामुळे ते त्या भागात येणार नाहीत. अशी खबरदारी घ्या - जेव्हा तुम्ही तुमच्या बागेत राख पसरवत असाल तेव्हा तुमच्या डोळ्यात चष्मा घाला. याशिवाय डस्ट मास्कही लावायला हवा. हे वाचा - माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे समजल्यावर तुमचा हात फ्रीजकडे नाही जाणार लाकडाची राख इतर कोणत्याही खतांमध्ये मिसळून बागेत, शेतात वापरू नका. पावसाळ्यात राखेचा वापर टाळा. त्यामुळे राखेमध्ये असलेले फायदेशीर घटक पावसात वाहून जातील. गुलाब आणि बटाट्यावर लाकडाची राख वापरू नका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gardening, Organic farming

    पुढील बातम्या