मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे समजल्यावर तुमचा हात फ्रीजकडे नाही जाणार

माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे समजल्यावर तुमचा हात फ्रीजकडे नाही जाणार

मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते.

मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते.

मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 11 मे : रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो. उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं फायदेशीर आहे. आज मडके/ माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत. हे फायदे समजल्यानंतर तुम्हीही फ्रीजचं थंड पाणी पिणं (Benefits of Clay Pot Water) सोडून द्याल. माठातील पाणी पिण्याचे फायदे - 1) पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवते- हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते. बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पाण्याचे तापमान कमी होते आणि ते थंड राहते. 2) नॅचरल प्युरिफायर - आजकाल तुम्हाला पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्युरिफायर मिळतील. मात्र, मातीच्या भांड्यांचा वापर केवळ पाणी थंड करण्यासाठीच नाही तर ते नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करण्यासाठी देखील केला जातो. 3) उष्माघातापासून बचाव करण्यासाठी - उन्हाळ्यात उष्माघात होणं एक सामान्य समस्या आहे. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सूर्यास्त्राचा सामना करण्यास मदत होते, कारण मातीचे भांडे पाण्यात भरपूर खनिजे आणि पोषक घटक राखून ठेवते आणि त्वरीत रीहायड्रेट होण्यास मदत करते. हे वाचा -Hair Care Tips: एका आठवड्यात केस कितीवेळा धुवावेत? अनेकजण इथंच चूक करतात 4) चयापचय वाढवते - मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्यातील केमिकल्सदेखील कमी करते. मातीच्या भांड्यातील पाणी दररोज पिल्याने चयापचय वाढते. माठातील पाण्यात असलेल्या खनिजांमुळे आपले पचन सुधारू शकते. 5) घशासाठी चांगले – फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घशात खाज सुटणे आणि खवखवण्याचा होऊ शकतो. पण मातीच्या मडक्यातील पाण्याचे तापमान घशासाठी सौम्य असते आणि त्यामुळे तीव्र खोकला वाढत नाही. हे वाचा - आर्थिक चणचण, अनंत अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा असा करतात उपयोग 6) आम्लपित्त निघून जाते - मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात. त्यामुळे अॅसिडिटी आणि गॅस्ट्रिकशी संबंधित समस्या दूर राहतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Summer, Summer season

पुढील बातम्या