Home /News /lifestyle /

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

गरज पडल्यास गडबडीच्या वेळात हँड सॅनिटायझरच्या मदतीने आपण चष्मा देखील स्वच्छ करू शकतो. आपण इतर कोणत्या कामांसाठी हँड सॅनिटायझर वापरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.

  मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे महत्त्व समजले आहे. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, या हँड सॅनिटायझरच्या मदतीने आपली अनेक कामे सोपी होऊ शकतात. गरज पडल्यास गडबडीच्या वेळात हँड सॅनिटायझरच्या मदतीने आपण चष्मा देखील स्वच्छ करू शकतो आणि आवश्यक असल्यास तुमचा मेकअप ठीक करण्यासाठी वापरू शकता. आपण इतर कोणत्या कामांसाठी हँड सॅनिटायझर वापरू शकतो याबद्दल जाणून घेऊया. मेकअप ब्रश स्वच्छ करा - खराब मेकअप ब्रश वापरल्याने त्वचेवर अनेक प्रकारचे इन्फेक्शन किंवा पिंपल्स होऊ शकतात. तुमचा मेकअप ब्रश घाण झाला असेल आणि तुम्ही तो साबणाने धुवू शकत नसाल तर तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता. मोबाईलची स्वच्छता - मोबाईल कधीही ओल्या कपड्याने किंवा पाण्याने स्वच्छ करू नये. मोबाईलची स्क्रीन घाण झाली असेल आणि तुम्हाला पाहण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ती लगेच हँड सॅनिटायझरने पुसून टाकू शकता. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार लिपस्टिकचे डाग - तुमच्या ड्रेसवर लिपस्टिकच्या खुणा असतील तर लगेच त्यावर हँड सॅनिटायझर स्प्रे करा आणि घासून स्वच्छ करा. यामुळे डाग लगेच हलके होतील. स्टिकर काढा - नवीन भांडी किंवा कशावरही स्टिकर असल्यास ते काढण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरा. यासाठी तुम्ही स्टिकरच्या भागावर थोडेसे सॅनिटायझर लावा आणि स्टिकर घासा, लगेच निघेल. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम काच स्वच्छ होते- सॅनिटायझरच्या मदतीने तुम्ही काचेच्या खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करू शकता. याशिवाय तुम्ही याच्या मदतीने आरसाही स्वच्छ करू शकता. परमनंट मार्कर मार्क्स - व्हाइट बोर्ड किंवा कशावर कायम मार्करच्या खुना असल्यास तुम्ही सॅनिटायझर वापरून मार्करचे चिन्ह स्वच्छ करू शकता.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Lifestyle, Sanitizer

  पुढील बातम्या