Home /News /lifestyle /

OMG! 2026 ला जग अंधारात बुडणार? टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं टेन्शन

OMG! 2026 ला जग अंधारात बुडणार? टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं टेन्शन

2026ला जग अंधारात बुडणार;टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं tension

2026ला जग अंधारात बुडणार;टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं tension

6 जून 2026 मध्ये पूर्ण जगात अंधार होईल. कोणताही उजेड असणार नाही. तीन दिवस अवघं विश्व अंधकारमय असेल, असा दावा स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवून घेणाऱ्या एकाने केला आहे. सोशल मीडियावरच्या त्याच्या VIDEO ने खळबळ उडाली आहे.

    दिल्ली, 5 मे : टाईम ट्रॅव्हल हा असा विषय आहे की ज्यावर आतापर्यंत बरच लिखाण झालं आहे, कितीतरी पुस्तक, व्हीडिओ आणि सिनेमे टाईम ट्रॅव्हलींगवर काढण्यात आले आहेत. त्यासाठी विज्ञानाच्या आधारेही काही दावे केले जातात. यातले किती दावे खरे आणि किती खोटे आहेत हे समोर येऊ शकत नसलं. तरी दर काही काळाने हे दावे करणारे समोर येत असता. 1911 मध्ये शार्लोट अ‍ॅन मोबर्ली  (Charlotte Anne Moberley)  आणि एलेनोर जॉर्डन  (Eleanor Jordan)  यांनी अ‍ॅन अ‍ॅडवेंचर (An Adventure) नावाच्या पुस्तकात टाइम ट्रॅव्हलिंगबद्दल दावा केला होता. तर 2006 मध्ये सुद्धा स्वीडनच्या हॉकन नोर्डक्विस्ट (Hawkins Nordquis) याने भविष्यात प्रवास केल्याचा दावा केला होता. टाईम ट्रॅव्हलिंग (Time traveling) म्हणजे भविष्यकाळात केलेला प्रवास असं मानलं जातं. (अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम, सौंदर्यांच्या घायाळ करणाऱ्या अदा) आता असाच टाइम ट्रॅव्हलिंग (Time Traveling)  बद्दलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने टाइम ट्रॅव्हलिंगचा दावा केला आहे.  त्याने टाइम ट्रॅव्हलिंग करुन 2582 या वर्षांपर्यंत जाण्याचा दावा केला आहे. त्याच्या मते 2026 या साली 3 दिवस पृथ्वी पूर्णपणे अंधकारमय होणार आहे आणि उजेडासाठी कोणतंही साधन वापरत येणार नाही. त्याच्या या दाव्यासाठी कोणताही पुरावा आता नसला तरी,  त्याने केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. (Lockdown लागताच कोल्हापूरकरांनी राजकीय मंडळांचा Whatsapp वरुन घेतला समाचार) बऱ्याचदा TikTok सारख्या सोशल साइटवर वेगवेगळे व्हीडिओ येत असतात. मनोरंजनासाठी आपण असे व्हीडिओ पाहत असतो. मात्र, आता एका टीकटॉक (Tik Tok) युजरने 2026 मध्ये पूर्ण अंधार होण्याचा दावा केल्याने खळबळ माजलेली आहे. 6 जून 2026 मध्ये पूर्ण जगात अंधार होईल कोणताही उजेड राहणार नाही. अशा परिस्थितीत आकाशाकडेही पाहता येणार नाही. लाईट किंवा उजेसाठी वापरलं जाणारं कोणतंही साधन वापरता येणार नाही, असं त्यांने आपल्या व्हीडिओ (Video) मध्ये सांगितलेलं आहे. (...तर कोरोना निदानासाठी RT-PCR TEST करू नका; ICMR च्या नव्या गाइडलाइन्स) @timetraveler2582 हाTikTok user आपल्या अकाऊंटवरुन अशा प्रकारचे व्हीडिओ टाकतो. त्याचा दावा आहे की तो टाईम ट्रॅव्हल करून 2582 मध्ये 561 वर्ष पुढे गेला होता. टाइम ट्रॅव्हलरने हाही दावा केला आहे की पुढील 5 वर्षात जगात अनेक बदल होणार आहेत. त्य़ाने हा व्हीडिओ पोस्ट केल्यावर त्याचे फॅन फॉलोईंग वाढलं आहे. मात्र सगळ्यांच्या मनात बरेच प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अनेकांनी कमेंट करुन त्यावेळी नेमक काय पाहिलं हे जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आहे. टाईम ट्रॅव्हलच्या या दाव्याने वैज्ञानिकांनाहा संभ्रमात टाकलं आहे. टाईम ट्रॅव्हलिंग करता येत का हे शोधण्यासाठी काही देशात खरोखरचं काही संशोधन सुरु आहे. मात्र अद्याप या संदर्भात कोणतेच वैज्ञानीक पुरावे मिळू शकलेले नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Tik tok, Tiktok viral video, Video viral

    पुढील बातम्या