मुंबई, 24 जुलै : बर्याच लोकांना असे वाटते की फर्टिलिटी ही केवळ स्त्रियांची निगडित समस्या आहे. परंतु पुरुषांमध्ये वंध्यत्व हीदेखील तितकीच सामान्य समस्या आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या म्हणजेच स्पर्म काउंट कमी होणे ही एक समस्या असते. याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर पडतो आणि वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागतात. पुरुषांच्या दैनंदिन जीवनातील काही चुका स्पर्म काउंट कमी होण्यास कारणीभूत ठरतात. आज म्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार येणार आहोत. स्पर्म काउंट कमी होण्याची कारणे - जर एखाद्या पुरुषाने बराच काळ टाईट बेल्ट घातला तर हळूहळू त्याची फर्टिलिटी कमी होऊ लागते. कारण टाईट बेल्ट घातल्याने पेल्विक एरियावर अनावश्यक दबाव निर्माण होतो. येथे पुरुषांचा खाजगी भाग असतो, ज्याचे मुख्य काम पुनरुत्पादनाचे असते. - टाईट पँट घातल्यामुळे पुरुषच्या या भागांमध्ये हवा नीट पोहोचू शकत नाही, त्यामुळे येथील तापमान वाढते आणि हे तापमान शुक्राणूंची संख्या कमी होण्यास जबाबदार मानले जाते.
वार्षिक सुट्टी आरोग्यासाठी का आहे फायदेशीर? पाहून तुम्हीही बॉसकडे मागाल मोठी लिव्ह- लैंगिक संक्रमित संसर्गामुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. - अँटिबायोटिक्स आणि ब्लड प्रेशर यांसारख्या औषधांमुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. - मेंदू आणि अंडकोष शुक्राणूंच्या निर्मितीसाठी जबाबदार असणारे अनेक हार्मोन्स तयार करतात. यापैकी कोणत्याही हार्मोनमधील असंतुलन स्पर्म काउंट कमी करू शकते. - वाढलेले वजन किंवा लठ्ठ असण्यामुळे तुमचा स्पर्म काउंट कमी होण्याचा धोका अनेक प्रकारे वाढतो. तुमचे शरीर तयार करू शकत असलेला स्पर्म काउंट जास्त वजनामुळे कमी होऊ शकतो. - मारिजुआना आणि कोकेनसह काही पदार्थांचा वापर स्पर्म काउंट कमी करू शकतो. जास्त मद्यपानदेखील याला कारणीभूत ठरतो. जे पुरुष सिगारेट ओढतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या धूम्रपान न करणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी असू शकते.
White discharge : हे खास पाणीच रोखेल अंगावरून जाणारं पांढरं पाणी; व्हाइट डिस्चार्जवर चमत्कारिक आहेत हे ड्रिंक्सकमी स्पर्म काउंटचा फर्टिलिटीवर कसा होतो परिणाम? स्पर्म काउंट कमी असणे नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता पूर्णपणे नाकारत नाही. परंतु यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. तुमचे शुक्राणू जितके कमी असतील तितकी तुमची जोडीदार गर्भवती होण्याची शक्यता कमी होईल. गर्भधारणा अधिक कठीण असू शकते. अशा जोडप्यांना गर्भधारणेसाठी, प्रजनन समस्या नसलेल्या जोडप्यांपेक्षा अधिक प्रयत्न करावे लागतील.