• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • आजच बदला तुमच्या या दैनंदिन 9 सवयी; अन्यथा स्वतःच द्याल मृत्यूला आमंत्रण

आजच बदला तुमच्या या दैनंदिन 9 सवयी; अन्यथा स्वतःच द्याल मृत्यूला आमंत्रण

रात्री उपाशी पोटी झोपण्याने आजार वाढायला लागतात.

रात्री उपाशी पोटी झोपण्याने आजार वाढायला लागतात.

काही लहानमोठ्या सवयी आरोग्यासाठी घातक असतात. काही सवयींमुळे आयुष्य अकाली संपण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा सवयींपासून दूर राहणंच हिताचं असतं

  • Share this:
नवी दिल्ली 19 जुलै : आरोग्य हीच संपत्ती (Health is Wealth) ही उक्ती सगळ्यांनाच माहित आहे. आरोग्यासाठीच्या चांगल्या वाईट गोष्टींबाबत लहानपणापासून वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला माहिती मिळत असते. अनेक सवयी आपण लहानपणापासून लावून घेतलेल्या असतात, तर काही सवयी मोठेपणी लागतात. नकळत काही सवयी अंगवळणी पडलेल्या असतात तर काही आपल्याला सोडणं शक्य होत नसतं. अशाच काही लहानमोठ्या सवयी आरोग्यासाठी घातक असतात. काही सवयींमुळे आयुष्य अकाली संपण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा सवयींपासून दूर राहणंच हिताचं असतं. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सूर्यकिरणांचा अतिवापर : आपल्या शरीराला डी थ्री (D-3 Vitamin) व्हिटॅमिनची गरज असते. कोवळ्या सूर्यप्रकाशातून ते मिळतं त्यासाठी अनेक लोक सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जातात. मात्र अतिप्रखर सूर्यप्रकाशात सतत राहिल्यास त्वचेचा कर्करोग (Skin Cancer) होण्याची शक्यता असते. विशेषतः गोऱ्या रंगाच्या (Fair Color) लोकांना आणि ज्या कुटुंबामध्ये त्वचेच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास आहे, अशा लोकांना हा धोका अधिक असतो. चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते प्लेसेंटा सूप उन्हात व्यायाम करणं धोकादायक : अनेक लोक दिवसाच्या प्रखर सूर्यप्रकाशात व्यायाम (Exercise in Heat) करतात. मात्र यामुळे शरीराचे तापमान वाढून त्वचेच्या आत रक्तप्रवाह अधिक वेगानं वाहतो, परिणामी स्नायूंना आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे हृदयाची गती वाढते आणि हिट स्ट्रोकचा (Heat Stroke) धोका वाढतो. ब्रेकफास्टची सवय नसणं : अनेकांना सकाळी ब्रेकफास्ट करण्याची (No Breakfast in Morning) सवय नसते. मात्र ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक असते. सकाळी ब्रेकफास्ट न करण्याच्या सवयीमुळे वजन, हार्मोन्स, स्मरणशक्ती तसंच मूडवर परिणाम होतो. ब्रेकफास्ट न करण्यानं चयापचय प्रकिया मंदावते आणि यामुळे वजन वाढू शकतं. रात्री भरपेट जेवणं : रात्रीचं जेवण उशिरा (Heavy Dinner) आणि अधिक प्रमाणात करणंही आरोग्याच्या दृष्टीनं वाईट असतं. यामुळं अधिक कॅलरी (High Calories) शरीराला मिळतात, ज्याचं चरबीत रुपांतर होतं. त्यामुळं रात्रीच्या तुलनेत नेहमी ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण अधिक असावं. लोक नेमकं उलटं करतात, असं येल स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक जॉन मॉर्टन यांनी म्हटलं आहे. पावसाळ्यात साखर, मीठामध्ये ओलावा तयार होण्याचं No Tension! फॉलो करा या टिप्स दातांची योग्य निगा न राखणं : दातांची निगा (Dental Health) राखणं हे सुद्धा उत्तम आरोग्याचं सूत्र आहे. दात चांगले असतील तर तुमच्या सौंदर्यातच भर पडते असं नाही तर आरोग्यही उत्तम राहतं. तोंडाला येणारा वास, हिरड्यांवर सूज, रक्त येणं यामुळे जबडा, गाल दुखणं यासह डोकेदुखीचाही तीव्र त्रास होतो. पेनकिलर्सचा सतत वापर : अनेक लोकांना जरासं काही दुखलं तरी पेनकिलर (Pain Killer) घेण्याची सवय असते. सतत अशा पेनकिलर घेण्याच्या सवयीमुळे अल्सर, आतड्यात रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. त्यामुळं अशा सवयीपासून दूर राहणं गरजेचं आहे. अति मीठ खाणं : अनेक आजारांमध्ये डॉक्टर मीठ कमी (Low Salt) खाण्याचा सल्ला देतात. तसंच मीठाचा अतिवापर सगळ्यांसाठीच धोकादायक असतो. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणात खाणं आवश्यक असतं. मात्र अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला धुडकावून जास्त प्रमाणात मीठ खातात. त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. 'वर्क फ्रॉम होम’ मुळे वाढली पाठदुखी; 'हे' छोटे बदल देतील आराम अपुरी झोप : शांत, गाढ झोप (Sleep) ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोप अपुरी होत असेल तर चिडचिड वाढते. हार्मोन्सचं असंतुलन वाढतं, त्यामुळं वजन वाढतं. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्वचेचं आरोग्य बिघडतं. रक्तदाबाचा त्रास होतो. याशिवाय नैराश्यासारख्या (Depression) मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. हे सगळं टाळायचं असेल तर दररोज किमान 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. धूम्रपान करू नये : हृदयरोग आणि कर्करोगानं होणाऱ्या 30 टक्के मृत्यूंसाठी धूम्रपान (Smoking) कारणीभूत असतं. 80 ते 90 टक्के लोकांना धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. सिगारेट, बिडी यांच्या सेवनानं तोंडाचा, गालाचा कर्करोग होतो. त्यामुळं धूम्रपानाच्या सवयीपासून दूर राहणं गरजेचं आहे. धूम्रपानाची सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडणं आवश्यक आहे. ही सवय सोडल्यास फुफ्फुस, श्वसनमार्ग सगळ्याचे आरोग्य सुधारतं. सध्याच्या काळात कोविड-19 प्रतिबंधात्मक लस(Vaccine) घेणं सर्वात आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही 18 वर्षांवरील असाल तरीही लस घेणं टाळत असाल तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल. कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि अन्य व्हेरीयंटसपासून संरक्षण करण्यासाठी लस घेणं अत्यावश्यक आहे.
Published by:Kiran Pharate
First published: