Home /News /lifestyle /

'वर्क फ्रॉम होम’ मुळे वाढली पाठदुखी; 'हे' छोटे बदल देतील आराम

'वर्क फ्रॉम होम’ मुळे वाढली पाठदुखी; 'हे' छोटे बदल देतील आराम

‘वर्क फ्रॉम होम’मुळे असा त्रास होत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे असा त्रास होत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा.

‘वर फ्रॉम होम’ मुळे बऱ्याच जाणांना कंबर आणि पाठदुखीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. वेळीच उपचार न केल्यास त्याचे दीर्घकाळ त्रास होऊ शकतो.

    नवी दिल्ली, 19 जुलै:  गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे (Corona) लॉकडाऊन (Lockdown) असल्याने बऱ्याच ऑफिसकडून कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (Work from home)  सुविधा देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा ऑफिसला जाण्याचा त्रास वाचत असला तरी, देखील बराच काळ घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे काहीजणांना पाठदुखी (Back pain) , कंबरदुखी असं त्रास होऊ लागले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे असा त्रास होत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा. योग्य खुर्ची वापरा ‘वर्क फ्रॉम होम’ असताना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास सगळ्यात जास्त होत आहे. बराचवेळ कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती काम केल्यामुळे मणक्याचा त्रास होऊ लागलेला आहे आणि त्यामुळेच कंबर आणि पाठ दुखायला लागते. या त्रासापासून बचाव करण्यासाठी आपली बसण्याची पद्धत बदला. याकरता चांगल्या कम्फर्टेबल खुर्चीची (Comfortable Chair) निवड करा. यामुळे काम करतांना थोडा वेळ पाठीला रिलॅक्स करता येऊ शकतं. (अंड आणि दूध एकत्र घेताय? तुम्हीच करताय स्वत:चं नुकसान) योग्य पद्धतीने बसा काम करताना टेबल आणि खुर्ची याचा वापर करून योग्य पद्धतीने बसणही अत्यंत आवश्यक आहे. खुप जास्त वाकून किंवा खुप जास्त ताठ बसून देखील पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य पद्धतीने खुर्चीमध्ये बसा. आधाराकरता एखाद्या उशीचा ही वापर करू शकता. काहीजणांना खुर्चीमध्ये बसल्यानंतर पाय दुमडून खुर्चीच्या मागच्या भाधावर ठेवायची सवय असते. मात्र, यामुळे पायातील रक्तप्रवाहवर परिणाम होऊ शकतो. (फक्त बदला काही सवयी; डोकेदुखीचा त्रास कायमचा संपेल) कम्प्युटर मॉनटर योग्यप्रकारे ठेवा कम्प्युटरवर काम करताना त्याचा मॉनेटर योग्य पद्धतीने ठेवणं महत्त्वाचं आहे. कम्प्युटर मॉनेटर आपल्या बसण्याच्या जागेपासून एक फूट अंतरावर असला पाहिजे. याशिवाय कम्प्युटर मॉनेटर आपल्या नजरेसमोर ठेवावा. खाली किंवा जास्तवर ठेवल्यास मानदुखीचा त्रास होऊ शकतो. मॉनेटरकडे पाहण्यासाठी जास्त वाकावं लागल्यामुळे मानेच्या मागच्या भागावर दबाव पडतो आणि यामुळे मान आणि पाठदुखी देखील होऊ शकते. (पाहा लिपस्टिकमधल्या धोकादायक केमिकल्सची यादी; दररोज लावण्याने होतो कॅन्सर) ब्रेक घेत राहा एकाच जागेवर खुप जास्त वेळ बसून काम केल्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखी होऊ शकते. त्यामुळे कामादरम्यान छोटासा ब्रेक घेत रहा. खुर्चीवरून उठून घरातच वॉक घ्या.  मसल्स स्ट्रेच करा. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Work from home

    पुढील बातम्या