काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक तर करत नाहीत ना?

काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक तर करत नाहीत ना?

काकडी (Cucumber) खाताना केलेली एक चूक तुम्हाला चांगलीच महागात पडले.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल  : उन्हाळ्यात काकडी (Cucumber) खायला सर्वांना आवडते. वाढत्या उकाड्यात काकडीने शरीराला थंडावा मिळतोच त्याबरोबर शरीरातील पाण्याची पातळीही (Body Water Level) चांगली राहते. काकडीत भरपूर प्रमाणात पोषक तत्व (Nutrients) असतात. काकडी शरीर डिहायड्रेट (Dehydrate) करते आणि त्वचा चमदार (Gloving skin) करते. पण काकडी खाताना केलेली एक चूक तुम्हाला चांगलीच महागात पडले.

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात नक्कीच काकडीच्या कोशिंबीरचा समावेश असावा. काही जणांना नुसती काकडी खायलाही आवडते. काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि शरीरासाठी आवश्यक असणारी पौष्टीक तत्व आहेत. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम,मॅंगनीजसारखे पोषक घटक असतात. उन्हाळ्यात शरीर निरोगी राहण्यासाठी हे सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत, म्हणूनच उन्हाळ्यात काकडीचे सेवन करणं खूप फायदेशीर मानले जाते.

पण तुम्हाला माहित आहे का?  काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे तुमच्या आरोग्याला नूकसान पोहोचू शकते? जरी काकडी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी त्यानंतर पाणी पिण्यामुळे आरोग्याला नुकसान होते.

हे वाचा - तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं हिरावतंय Soft Drink

काकडीमध्ये 95 टक्के पाणी आहे. काकडीतील पोषक घटक विशेषत: त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण काकाडीवर पाणी प्यायल्याने पोषकतत्व शरीराला पोहचत नाहीत.

जेवण झाल्यावर पाणी पिण्यामुळे पचन आणि पोषणाच्या नैसर्गिक प्रक्रियेस नुकसान होते. अन्न पचवण्यासाठी शरीराची पीएच (PH) पातळी योग्य असणे आवश्यक आहे. परंतु काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पीएच पातळी कमकुवत होते आणि पदार्थ पचवण्यासाठी आवश्यक असणारे आम्ल प्रभावीपणे कार्य करत नाहीत. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात.

काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या संपते. परंतु काकडीनंतर पाणी प्यायल्यास अतिसार आणि लूज मोशन होऊ शकतात. म्हणून काकडी खाल्ल्यानंतर कमीत कमी 20 ते 30 मिनिटांनी पाणी प्यावं. लगेच पाणी पिऊ नये.

हे वाचा - बीडच्या शेतकऱ्याची परदेशात कमाल! द्राक्षं पोहचली थेट युरोपच्या बाजारपेठेत

चांगल्या पोषक तत्वांच्या शोषणासाठी कच्च्या भाज्या आणि फळे खाल्यानंतर पाणी पिणं नेहमी टाळलं पाहिजे. केवळ काकडीच नाही तर टरबूज, अननस आणि स्ट्रॉबेरीसारखी पाण्याचे तत्व असणारी फळे आणि भाज्यांवरही पाणी पिऊ नये.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 10:32 PM IST

ताज्या बातम्या