फक्त हवेवर अवलंबून राहू नका; तर आहारामार्फतही वाढवा शरीरातील ऑक्सिजन पातळी

फक्त हवेवर अवलंबून राहू नका; तर आहारामार्फतही वाढवा शरीरातील ऑक्सिजन पातळी

कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसह शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणंही गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल :  कोरोनाशी लढण्यासाठी (Coronavirus) जशी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) महत्त्वाची आहे. तसंच शरीरातील ऑक्सिजन (Oxygen) पातळीही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सध्या बहुतेक कोरोना रुग्णांना श्वसन समस्या उद्भवत आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे आणि त्यातच आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना होऊ नये, यासाठी आधीपासूनच आपण खबरदारी घ्यायला हवी.

जसं तुम्ही कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखत आहात, मास्क लावत आहात. तसंच आहारावरही लक्ष देणं गरजेचं आहे. आहारातूनच आपल्याला असे घटक मिळतात ज्यामुळे बहुतेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्तीसह शरीरातील ऑक्सिजनही महत्त्वााच आहे. त्यामुळे इम्युनिटी आणि ऑक्सिजन पातळी आहाराच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल यावर भर द्यायला हवा.

हे वाचा - Coronavirus 2nd Wave: असा मास्क लावाल तरच होईल फायदा; कुठला मास्क वापरायचा?

रक्तातील (Blood) ऑक्सिजनची (Oxygen) पातळी चांगली राहणे हे महत्त्वाचे आहे. त्याकरता रक्तातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणं अतिशय आवश्यक आहे. याबाबत हार्वर्ड हेल्थ (Harvard Health) आणि अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं (USA Food and Drug Administration) आपल्या आहारात लोह (Iron), जीवनसत्त्वे (Vitamins) आणि फॉलिक अॅसिडचा (Folic Acid) समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. हे पोषक घटक रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत करतात.

हे वाचा - Corona Vaccine घेण्याआधीच कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत आता काय करू?

याकरता आहारात खालील पदार्थांचा समावेश करा.

- बटाटे, तीळ, काजू आणि मशरूममध्ये भरपूर प्रमाणात तांबे (कॉपर) आढळते.

- चिकन, मटणशिवाय सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या आणि डाळीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.

- अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व अ (व्हिटॅमिन ए) असते. याशिवाय रताळे, गाजर, दुधी, आंबा आणि पालक यामध्येही ते आढळते.

- ओट्स, दही, अंडी, बदाम, पनीर, ब्रेड आणि दूध यामध्ये राइबोफ्लेविन असते. त्यांचाही आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो.

- मांसाहारातून तसंच कडधान्य, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या भाजलेल्या बिया, भाजलेले शेंगदाणे यातूनदेखील जीवनसत्त्व ब-3 (व्हिटॅमिन बी-3) भरपूर प्रमाणात मिळते.

- चिकन, ट्यूना मासा, अंडी इत्यादींमधून जीवनसत्त्व ब-5 (व्हिटॅमिन बी-5) मिळू शकते. याशिवाय मशरूम, शेंगदाणे, अॅव्हाकॅडो, ब्रोकोली आणि ब्राऊन राईस यातूनही हे जीवनसत्व मिळते.

- चिकन, मासे, केळी, पालक इत्यादींमधून जीवनसत्त्व ब-6 (व्हिटॅमिन बी-6) आणि जीवनसत्त्व ब-9 (व्हिटॅमिन बी-6) भरपूर मिळते.

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. त्याचाही आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळेल. तसंच ऑक्सिजनची पातळी वाढण्यासदेखील ते उपयुक्त ठरते.

लसूणही आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात अल्कधर्मीय (Alkaline) गुणधर्म असतात. ऑक्सिजन वाढवण्यातही तो उपयुक्त ठरतो.

अंकुरीत म्हणजेच मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यांच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासही मदत मिळते. त्यामुळं आहारात मोड आलेले हरभरे, मूग, डाळी आदी पदार्थांचा जरूर समावेश करा.

First published: April 22, 2021, 4:20 PM IST

ताज्या बातम्या