नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : पावसाळ्यात (Monsoon) सगळीकडे चिखल, ओलावा, दमटपणा यामुळे जीवजंतू वाढतात. शिवाय आजार पसरवणाऱ्या किटाणूंची (Germs) पैदास होते. दूषित पाणी, वाढलेल्या मच्छरांमुळे आजार होतात. पावसात सतत हवामानात (Atmosphere) बदल होत राहतो. कधी अचानक गरम (Hot) वाटायला लागतं तर, कधी खूप थंड (Cold) त्यामुळे वारंवार आजारी होण्याचा धोका असतो.त्यामुळे या काळात तब्ब्येतीची काळजी (Health Care) घ्यावी लागते.
पावसाळ्यात आजारपणापासून वाचण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्यात आणि टाळाव्यात. पावसाळा सुरू होण्याआधी घरात स्वच्छता करावी. गार्डमध्ये, टेरेसवर, आवारात रिकामी भांडी ठेऊ नयेत. त्यात पाणी साठल्यामुळे मच्छरांची पैदास होते. बाहेरून आणलेला भाजीपाला, फळं स्वच्छ धुऊन घ्यावा. बाहेरचं अन्न खाणं टाळावं. या गोष्टी करण्याने आजारपण टाळता (Avoiding Illness) येतं.
याशिवाय आजार होऊ नयेत यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा.
आहारात असावेत काही पदार्थ
पावसाळ्यात पचनशक्ती कमी होत. त्यामुळे पचण्यास हलका असणारा आहार घ्यावा. पावसाळ्यात पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ले तर, पचनाच्या समस्या निर्माण होतात. अपचन, लूज मोशन्स होऊ शकतं. त्यामुळे हलका आहार घ्यावा. रंगीत फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. गाजर, पपई, नासपाती, कारलं, शिमला मिरची, मोसंबी, डाळिंब, स्ट्रॉबेरी अशा भाज्या आणि फळं खावीत.
(वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो)
स्ट्रिट फूड खाऊ नये
बऱ्याचजणांना स्ट्रिट फूड खायला आवडतं. पाणीपुरी, भजी, सॅन्डविच, मोमोज यासरख्या पदार्थांचे स्टॉल पाहताच आपली पावलं तिकडे वळतात. पण, उघड्यावरचं अन्न खाल्ल्याने पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. हे पदार्थ तयार करताना चांगल्या दर्जाचे पदार्थ आणि पाणी वापरलेलं असेलच असं नाही. दूषित पाण्यामुळे पावसाळ्यात कावीळ सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे अन्न पदार्थ टाळावेत. उलट इच्छा झाल्यास घरीच तयार करून खावेत.
(पावसाळ्यात कावीळ झाल्यास ‘हे’ घरगुती उपाय फायद्याचे; औषधांबरोबर नक्की करा)
भरपूर पाणी प्यावं
उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात तहान कमी लागते. त्यामुळे पाणी ही कमी प्यायलं जातं. यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे पावासामुळे थंड वातावरण असेल आणि तहान लागत नसेल तरी भरपूर पाणी प्यावं. पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर, लिंबू पाणी, नारळाचं पाणी, ज्यूससुद्धा घेऊ शकता.
(सतत थकवा जाणवणं असू शकते धोक्याची घंटा; 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचं असेल लक्षण)
थंड पदार्थ खाणं टाळा
पावसाळ्यात हवामानात बरेच बदल होत असतात. कधी कमी पावसामुळे तापमान वाढतं तर, कधी सततच्या पावसामुळे तापमान कमी होतं. त्यामुळे दही, आइक्रिम, कोल्ड्रिंक सारखे थंड पदार्थ पावसाळ्यात खाऊ नयेत.
याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना शरीराला उष्णता देणाऱ्या तेलांचा वापर करावा. तिळ, शेंगदाणा, नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑईल वापरावं. शिवाय मोहरीचं तेलही खाऊ शकता.
(औषधी गुळाचे आहेत बरेच फायदे; आरोग्याबरोबर त्वचेसाठीही उपयोगी)
जेवणात जास्त तिखटपदार्थ असू नयेत. मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते.
पोळीऐवजी भाकरी खावी. भाकरी पचायला हलकी असते.
गवती चहा किंवा आलं घातलेला चहा दिवसातून दोनदा प्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips, Lifestyle, Monsoon