मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पावसाळ्यात कावीळ झाल्यास ‘हे’ घरगुती उपाय फायद्याचे; औषधांबरोबर नक्की करा

पावसाळ्यात कावीळ झाल्यास ‘हे’ घरगुती उपाय फायद्याचे; औषधांबरोबर नक्की करा

कावीळ झाली असेल तर, कच्चे शिंगाडे खावेत.

कावीळ झाली असेल तर, कच्चे शिंगाडे खावेत.

कावीळ (Jaundice) वाढली तर, यकृत निकामी होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपचार करणं आवश्यक असतं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : पावसाळ्यात कावीळ (Jaundice) सारखा आजार डोकं वर काढतो. दूषित पाण्यामुळे (Contaminated Water) होणारा हा आजार जंक फूड, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्यानेही होतो. काविळमुळे लोकांना अनेक समस्यांना (Problem) सामोरं जावं लागतं. यामध्ये यकृत कमकुवत होऊन काम करणं बंद करतं. शरीरात बिलीरुबिनची पातळी (Bilirubin Levol) वाढल्यामुळे होतो. यामध्ये त्वचा, नखं आणि डोळे पिवळे होऊ लागतात. कावीळ झाल्यास बहुतेक लोक औषधं (Medicine)घेतात. पण, औषधांचे काही दुष्परिणाम (Side Effect of Medicine) होऊ शकतात. त्यामुळे कावीळ झाल्यास घरगुती उपायही(Home Remedies)करता येतात. पाहुयात कावीळ किंवा जॉईंडीस बरा करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात.

उसाचा रस

काविळ बरी करण्यासाठी उसाचा रस घेऊ शकता. कावीळ झालेल्या व्यक्तीने दिवसातून 3 ते 4 वेळा उसाचा रस घ्यावा.

टोमॅटोचा रस

काविळ झाली असेल तर, टोमॅटोचा रस घेतल्याने फायदा होतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक असतो, जो यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस घेतला तर, त्याचा परिणाम जास्त लवकर दिसून येतो.

(जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण)

ताक आणि दही

ताक आणि दही घेतल्याने कावीळचा त्रास लवकर कमी होऊ लागते. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी 1 ग्लास ताक किंवा 1 वाटी दही खाऊ शकता. दही खाल्लाने जीवाणूंमुळे होणारं संक्रमण कमी होऊन कावीळची लक्षणं कमी होतात.

नारळ पाणी

नारळाचं पाणी देखील कावीळ बरं करण्यास मदत करतं. यकृत निरोगी ठेवण्यातही नारळचं पाणी महत्वाची भूमिका बजावतं. शिवाय पचनसंस्थाही निरोगी राहते.

(सतत थकवा जाणवणं असू शकते धोक्याची घंटा; 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचं असेल लक्षण)

पपई

कच्ची किंवा पिकलेली पपई काविळ कमी करण्यात खूप मदत करते. कच्च्या पपईची मसाल्याशिवाय भाजी तय़ार करुन खाल्ल्यास यकृताचं आरोग्य लवकर सुधारण्यास मदत होते. तर, कावीळ बरी करण्यात पिकलेली पपईही महत्वाची मानली जाते.

(...म्हणून महिला जगतात पुरुषांपेक्षा दीर्घायुषी; तुम्हाला माहिती आहेत का करणं ?)

मुळ्याची पानं

काविळीचा त्रास होत असेल तर, मुळ्याच्या पानांचा रस प्यावा. हा रस चविला चांगला नसतो. त्यामुळे त्यात खडीसाखर घालू शकता. मुळ्याच्या रस पानांचा काढा. त्यात खडीसाखर घाला. आवडत असल्यास लिंबाचा रस घालून मुळ्याचा रस पिऊ शकता.

First published:

Tags: Food, Home remedies, Lifestyle, Monsoon