उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि हेल्दी आहार महत्त्वाचा आहे. व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, किमान अर्धा तास वॉक करणं महत्वाचं आहे. मात्र, बऱ्याच जणांना दररोज एकाच पद्धतीने चालणं कंटाळवाणं वाटायला लागतं. हा कंटाळा दूर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने चालण्याची किंवा जॉगिंग करण्याची सवय लावू शकता. सरळ चालण्याऐवजी उलटं चालल्यामुळे आरोग्याला फायदे मिळू शकतात. उलटं चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात, बॉडी बॅलन्स वाढतो, स्टॅमिना वाढतो. आणखीनही बेरच फायदे होतात. चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणाऱ्या स्नायूंवरचा तणाव कमी होतो. आपल्या शरीरामधील हॅमस्ट्रिंग्स, क्वॉड्स आणि काफ मसल्सचा जास्त वापर होत नाही. कारण सरळ चालताना यावर भार येत नाही. मात्र, उलटं चालण्यामुळे या स्नायूंचाही वापर होऊन मजबुती येते. उलटं जाण्यामुळे शरीर आणि पायाचे स्नायू लवचिक बनतात. उलटं चालताना किंवा धावताना आपल्या शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होता. यामुळे वेटलॉससाठी जास्त फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी उलटं जाण्याची सवय लावा.