मुंबई, 06 जुलै : पोटाच्या संसर्गाला पोट फ्लू असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे तीव्र ओटीपोटात दुखण्यासोबत अनेक लक्षणे दिसू शकतात. पोटात दीर्घकाळ जंतुसंसर्ग राहिल्यास आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे पोटाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटात संसर्ग झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबाबत जाणून (Stomach Infection Symptom) घेऊया.
पोटात संसर्ग झाल्यास शरीरात अशी लक्षणं दिसतात-
उलट्या-
उलट्या होण्याला अनेकजण कॉमन समजतात. पण, उलट्या होण्याचा त्रास वारंवार होत तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण वारंवार उलट्या होणे हे पोटाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.
अतिसार-
अनेकांना पोटदुखीची समस्या वारंवार उद्भवते, असे पोटात गडबड झाल्यामुळे होते. परंतु बहुतेक लोक सामान्य म्हणून त्यकडे दुर्लक्ष करतात. कोणाला बऱ्याच काळापासून अतिसाराचा त्रास होत असेल. त्यामुळे ते पोटाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या स्थितीत आपल्याला डिहायड्रेटेड वाटू शकते. त्यामुळे जुलाब किंवा अतिसाराकडे दुर्लक्ष करू नका.
पोटदुखी -
पोटाच्या संसर्गाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पोटदुखी. या दरम्यान तुम्हाला तीव्र ओटीपोटात दुखणे, ओटीपोटात पेटके जाणवू शकतात. जर तुम्हाला वारंवार पोटदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
स्नायूंमध्ये वेदना -
बहुतेक लोक स्नायूंच्या दुखण्याला कमजोरी मानतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. पण पोटाच्या संसर्गामुळेही स्नायू दुखू शकतात. शरीराच्या प्रत्येक भागात जसे की पाठ, कंबर आणि पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.