Home /News /lifestyle /

आयुर्वेदात आहे मानसिक आजार बरे करण्याची ताकद; गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी घरगुती वनौषधी असल्याचा दावा

आयुर्वेदात आहे मानसिक आजार बरे करण्याची ताकद; गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी घरगुती वनौषधी असल्याचा दावा

जटामांसीच्या मुळांचा वापर ताणविरोधी औषधी म्हणून केला जातो.

जटामांसीच्या मुळांचा वापर ताणविरोधी औषधी म्हणून केला जातो.

भारतात प्रत्येक 5 व्यक्तींपैंकी एकजण डिप्रेशनचा शिकार असतो. तणावामुळेच पुढे हिंसाचार किंवा आत्महत्या (Violence or Suicide) करण्यासारख्या घटना घडतात.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : डिप्रेशन (Depression) हा सगळ्यात घातक मानसिक आजार आहे. या आजारावर लवकरात लवकर उपचार होणं आवश्यक असतं. शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार (Mental Illness) ही घातक असतात. भारतात प्रत्येक 5 व्यक्तींपैंकी एकजण डिप्रेशनचा शिकार असतो. तणावामुळेच पुढे हिंसाचार किंवा आत्महत्या (Violence or Suicide) करण्यासारख्या घटना घडतात. जास्त दिवस हा त्रास राहिल्यास एकग्रता (Concentration) कमी होते. डोकेदुखी, थकवा असे त्रास होतात. या आजारावर औषधांबरोबर आयुर्वेदिक औषध आहे फायदेशीर (Ayurvedic medicine is beneficial) आहेत. आयुर्वेदाचे उपचार साइड इफेक्ट नसलेले आणि म्हणूनच अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात येतो. आयुर्वेदाचे तज्ज्ञ मानसिक आजारांसाठी वनौषधी जास्त प्रभावी असल्याचंही सांगतात. पुदिना पुदिना डिप्रेशनवर एक चांगलं औषध ठरू शकतो. यामध्ये तणावाशी लढण्याची ताकद असते. पुदिनामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे मेंदू शांत करण्यात मदत होत आणि त्यामुळे तावामधून बाहेर पडण्यास मदत होते. (हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय घालतात टूथपेस्टमध्ये? शंका दूर करण्यासाठी वाचाच) ब्राह्मी ब्राह्मी ताणव कमी करुन स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. ब्राह्मीच्या तेलाची मॉलिश करू शकता. चहात किंवा कॅप्सूलही घेता येतात. ब्राह्मी नियमितपणे घेतल्याने ताण आणि चिंता प्रभावीपणे कमी करता येते. अश्वगंधा अश्वगंधा ही स्मरणशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी आहे. मधुमेह, जळजळ, तणाव आणि चिंता दूर करण्यासही मदत करते. अश्वगंधाच्या नियमित घेतल्या चांगली झोप लागते. उत्साह वाढतो. चहा, दुध आणि कोमट पाण्यात मिसळून अश्वगंधा पिता येते. (कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही? हे पदार्थ तब्येत वाढवतील फटाफट) शंखपुष्पी शंखपुष्पी मेंदू तल्लख करुन शांत होण्यासाठीही मदत करते. डिप्रेशनवर औषध म्हणून घेताना दररोज 5 ग्रॅम शंखपुष्पी पावडर घेण्यानं फायदा होतो. सर्पगंधा डिप्रेशनवर आयुर्वेदिक औषध म्हणून सर्पगंधा वापरता येते. यामुळे मेंदू शांत होतो. याशिवाय ब्लड प्रेशर, अनिद्रा सारखे त्रास कमी होतात. दररोज 1 ग्रॅम सर्पगंधा पावडर किंवा 20 ते 50 मिलीग्रॅम एक्स्ट्राक्ट घेतल्यास फायदा होतो. (केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहिती झाले तर, ताटात जेवणं बंद कराल) जटामांसी जटामांसीच्या मुळांचा वापर ताण विरोधी औषधी म्हणून केला जातो. जटामांसीमुळे तणाव कमी होतो. याशिवाय शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम जटामांसी करते. भृंगराज भृंगराज डिटॉक्सिफाय करण्यात मदत करतं. शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून रक्ताभिसरण वाढवतं. केसांना भृंगराज तेल लावल्यामुळे मेंदू शांत होतो. भृंगराज चहामध्येही वापरला जातो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Depression, Health Tips, Lifestyle, Stress

    पुढील बातम्या