Home /News /lifestyle /

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही? हे पदार्थ तब्येत वाढवतील फटाफट

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही? हे पदार्थ तब्येत वाढवतील फटाफट

वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतं.

वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतं.

Weight Gain Problem : लठपणा जशी एक समस्या आहे तशीच, वजन न वाढणंसुद्धा. कारण खूप जास्त खाऊनसुद्धा वजन न वाढण्याचा त्रासही काही जणांना असतो.

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : लठ्ठपणामुळे(Obesity)अनेक आरोग्य समस्या (Health Problem) होतात. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की आपण बारीकच रहावं. म्हणजे शरीरात चरबी (Fats) कमी राहिल्याने आजारपण येणार नाही. काही लोक असे असतात जे आधी बारीक असतात पण, वयानुसार त्यांचं वजन वाढत (Weight Gain) राहतं. त्याऊलट काही लोकांचं कितीही खाल्लं तरी वजन वाढतचं नाही. वयोमानानुसार शरीरात चरबी जमा (Accumulation of Body Fat with Age) होणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे, पण काही लोकाच्या शरीरात जास्त खाल्ल्यावरही काही फरक पडत नाही. सडपातळ शरीर असेल आणि वजन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले असतील तर, आहारात या गोष्टींचा समावेश करायला हवा. तज्ज्ञांच्यामते वजन वाढवण्यासाठी आहारात प्रोटिनचा (Protein) समावेश करणं आवश्यक आहे. अंडी खा वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतं. अंड्यांमध्ये प्रोटीन, फॅट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. अंडी वेगाने वजन वाढण्यात मदत करतात. अंड्यांबरोबर आहारात मटण, चिकन आणि मासे यांचाही समावेश करू शकता. वजन वाढवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. (आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट) मनुका आणि अंजीर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन वाढवण्याच्या घरगुती उपायांपैकी एक म्हणजे जास्तीत जास्त सुकामेवा खाणं. ड्रायफ्रुट्स मनुका आणि अंजीर वजन वाढण्यात फार फायदेशीर आहेत. मनुका आणि अंजीर सम प्रमाणात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. या उपायाने वजन वाढायला लागेल. (कहर कपल! नोकरी सोडून दोन वर्षं हनीमून करत फिरले; किती लाख उधळले वाचून व्हाल थक्क) बटाटा साधे दिसणारे बटाटे आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत. हेच बटाटे वजन वाढवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. बटाट्यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च असतं. याशिवाय, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि झिंक देखील त्यात आढळतं. बटाट्यातील कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन, ग्लुकोज, एमिनो अ‍ॅसिडमध्ये रूपांतरित होऊन शरीराला त्वरित शक्ती देतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. (गे-लेस्बियन्सना शोधून तालिबान सर्वांसमोर देणार क्रूर शिक्षा; वाचूनही उडेल थरकाप) केळी भूक लागल्यावर पोट भरण्यासाठी अशक्तपणा कमी करण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जाते. केळ्याने लगेच ताकद मिळते. वजन वाढवायचे असेल तर, आहारात केळ्यांचाही समावेश करू शकता. केळ्यांमध्ये भरपूर  प्रमाणात फॅट आणि कॅलरीज आढळतात. आवडत असेल तर, दूध आणि केळीही खाऊ शकता. याशिवाय वजन वाढवण्यासाठी केळींचा शेक करून पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Lifestyle, Weight gain, Weight loss

    पुढील बातम्या