Home /News /lifestyle /

केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी कितीतरी फायदे, म्हणून दक्षिण भारतात हजारो वर्षांपासून आहे परंपरा

केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी कितीतरी फायदे, म्हणून दक्षिण भारतात हजारो वर्षांपासून आहे परंपरा

दररोज केळीच्या पानावर जेवल्यामुळे आरोग्य चांगलं (Health Benefits) राहतं. त्वचा रोग होत नाहीत. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस सारखे त्रास होत नाहीत. केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट पोटामध्ये जातात.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट :  केळीच्या पानावर जेवण्याची दक्षिण भारतातली (South India) प्रथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साउथमध्ये गेल्यानंतर आपल्याला केळीच्या पानावर (Banana Leaf) जेवण वाढलं जातं. इतकेच काय तर, साधारणपणे उडपी हॉटेलमध्ये (Udupi Hotel) गेल्यावर सुद्धा केळीच्या पानावर पदार्थ वाढले जातात. ओनम (Onam) सारख्या सणाच्या वेळी याच पानावर जेवतात. साउथमध्ये पाहुण्यांना केळीच्या वरच्या भागावर जेवण वाढण्याची आणि खालचा भाग म्हणजे देठाकडचा भाग घरच्या लोकांसाठी ठेवण्याची पद्धत आहे. केळीच्या पानामध्येच सगळ्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. तिथली ही परंपरा हजारो वर्षांपासून (Tradition for Thousands of Years) आहे. याला आयुर्वेदिक (Ayurvedic) महत्त्व देखील आहे. खनिज असतात आयुर्वेदानुसार केळ्यामध्ये प्लॅन्ट बेस्ड कंपाऊंड जास्त असतात. केळीच्या पानातील आढणारे पॉलीफेनॉल्स किंवा एपिगॅलोकेटॅचिन गॅलेट किंवा ईजीसीजी म्हटलं जाणारे हे घटक ग्रीन टीमध्ये आढळता. यापासून नैसर्गिक अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट मिळतात. त्यामुळे फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि आजारपण येत नाही. केळ्याचं पान खाणं शक्य नसतं पण, त्यावर गरम जेवण जेवल्यामुळे यातले पौष्टिक घटक पोटात जातात. केळ्यामधील अ‍ॅन्टीबॅक्टरियल घटक जेवणातले किटाणू देखील मारतात. त्यामुळे आजारपणाची शक्यता कमी होते. (आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट) केळीच्या पानावर एक मेणासारखा पापुद्रा असतो. जो अतिशय सूक्ष्म असतो पण, त्यामुळे जेवणाची चव वाढते. यावर गरम जेवण वाढल्यानंतर त्यावरील हा पापुद्रा वितळतो आणि जेवणाला चांगली चव येते. बरेच लोक कधीकधी डिस्पोजेबल भांड्याची गरज असताना प्लॅस्टिक किंवा स्टायरोफोम प्लेट वापरतात मात्र, केळी त्यापेक्षा पर्यावरण पूरक असतात. केळीच्या पानाचं विघटन प्लास्टिकपेक्षा वेगाने होऊ शकतं. या पानावर जेवल्यामुळे कामंही कमी होतात. जेवणासाठी घेतलेली ताटं घासायचं झंझट राहत नाही. याशिवाय अस्वच्छ ताटामधून पोटात साबणासारखा पदार्थ जाण्याची भीती राहत नाही. (कहर कपल! नोकरी सोडून दोन वर्षं हनीमून करत फिरले; किती लाख उधळले वाचून व्हाल थक्क) भांडी घासण्यासाठी साबण वापरला जातो. साबणामधील काही रसायनिक घटक आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. पण, केळीची पानं वापरताना देखील स्वच्छ धुणं आवश्यक असतं. कधीकधी पानांवरसुद्धा जंतू आणि किटाणू असू शकतात. पण, केळीच्या पानावर जेवणं म्हणजे केमिकल फ्री आहार घेण्यासारखेच आहे. ही पानं त्यावरील मेणाच्या थरामुळे वॉटरप्रूफ असतात. (भूक लागली म्हणून कधीही काहीही खाणं पडेल महागात; 'हे' 8 पदार्थ विशिष्ट वेळेलाच खा) दररोज केळीच्या पानावर जेवल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. त्वचा रोग होत नाहीत. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस सारखे त्रास होत नाहीत. केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट पोटामध्ये जातात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Indian cuisine, Tasty food

    पुढील बातम्या